Skip to product information
1 of 2

Payal Books

nisargshala निसर्गशाळा - पर्यावरण विषयक उपक्रम ( ३ पुस्तकांचा संच) by

Regular price Rs. 808.00
Regular price Rs. 900.00 Sale price Rs. 808.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publications
निसर्ग शिक्षण मुलांपर्यन्त पोहोचवणे या हेतूने ‘निसगर्शाळा’ या पुस्तक संचाची रचना करण्यात आली आहे. निसगर्शाळा हा तीन पुस्तकांचा संच आहे. या पुस्तकांचा आधार घेऊन कुठल्याही शाळेला ‘पयार्वरविषयक विशेष कायर्क्रम’ हाती घेता येईल. प्रत्येक पुस्तकात जवळपास ५० उपक्रम आहेत. इयत्ता ५ वी, ६ वी, ७ वी (मुलांचे वय वर्ष १०-१२) साठी हे उपक्रम योजिले आहेत.

ही पुस्तके शिक्षक व पालक यांच्यासाठी आहेत, जेणेकरून ते मुलांसाठी हा अभ्यासक्रम राबवू शकतील. यात मुलांना निसर्गातील  नदी, डोंगर, माती, झाडं, पशू-पक्षी, किटकादी विविध घटकांची ओळख व्हावी, त्यांचं महत्त्व कळावं तसंच त्यांची जोपासना करणं का आवश्यक आहे, ती कशी करावी हे उपक्रमांच्या माध्यमातून स्वानुभवाने कळेल. या अभ्यासक्रमातले उपक्रम कोणत्या क्रमाने व कशा पद्धतीने घ्यावेत याचा विचार करुन तयार के ले आहेत. निसर्गाची ओळख याबरोबरच मुलांच्या विविध कलागुणांना प्रोत्साहन, त्यांचा व्यक्तिमत्त्वविकास ही सुद्धा या अभ्यासक्रमाची वैशिष्ठ्ये आहेत. निसगर्शाळा हा अभ्यासक्रम आत्तापर्यन्त  घोटावडे, वाई, गोवा, रणथंबोर अशा काही ठिकाणी जिल्हा पिरषदेच्या व इतर शाळांमध्ये, संस्थेने प्रत्यक्ष राबिवलेला आहे. ग्राममंगल या संस्थेच्या मागर्दशर्नाखाली, रचनावादी तत्वावर हे उपक्रम आधारलेले आहेत. यात मुले प्रत्यक्ष अनुभूती घेऊन त्या उपक्रमाची मजा घेत शिकतात. या पुस्तकाचा आधार घेऊन असे उपक्रम काही शाळांमध्ये राबवले जात आहेत. ज्यांना मुलांचा छान प्रतिसाद मिळतो आहे. या अभ्यासक्रमाच्या ‘तयारीसाठी’ व ‘संशोधनासाठी’ महाराष्ट्र शासनाच्या पयार्वरण विभागाच्या ‘हरित  संकल्पना’ योजनेचे आर्थिक  साह्य ऑयकॉसला लाभले. निसर्ग शिक्षण  ही काळाची गरज तर आहेच पण निसर्गाजवळ  जाऊन त्यातल्या गमती जमती प्रत्येकाला कळाव्या, त्यावर मैत्र जडावे, जेणेकरून संवर्धन हा आपल्या स्वभावाचाच एक भाग बनेल, व निसर्ग सहवासाचा निस्सीम आनंद प्रत्येकाला अनुभवता येईल ही या पुस्तकांमागची संकल्पना !