Nisargachya Chhayet निसर्गाच्या छायेत by Arun Shevate अरुण शेवते
Nisargachya Chhayet निसर्गाच्या छायेत by Arun Shevate अरुण शेवते
निसर्गाच्या छायेत आपण सतत वावरत असतो. निसर्गाचे आणि आपले नाते अतूट आहे.
निसर्गाच्या -हासाला सुरुवात झाली की, आपल्याही हासाला सुरुवात होते. माणूस आणि निसर्ग जगला पाहिजे. पाऊस, झाड, पक्षी, नदी, समुद्र, आकाश यांची ओढ मनाला वाटते. आपण एकटे नाही असे जाणवते. निसर्गाच्या आणि माणसाच्या जन्मापासून निर्माण झालेला हा नात्याचा प्रवास विलक्षण आहे. तो समजून घेऊन हा नातेसंबंध उत्कट होणे गरजेचे आहे. पर्यावरणाकडे दुर्लक्ष होऊन चालणार नाही. हाच या पुस्तकाचा मुख्य गाभा आहे. आपले जीवन गतिमान बनत चाललेले आहे. जमिनीवरून दिसणाऱ्या चंद्रावर आपण आपल्या पावलांचे ठसे उमटवले. माणसाच्या बुद्धीची गती अगाध आहे. तिचा अंदाज घेणे कठीण आहे. दिवसेंदिवस आपण अधिकाधिक भौतिक प्रगतीकडे वाटचाल करत असताना आपल्या हातात ओंजळभर बिया हव्यात. त्या रुजत गेल्या की सावल्यांचे रूप आपल्या अवतीभोवती असेल. आपल्या रूपाइतकेच ते रूप महत्त्वाचे आहे. ते रूप ओळखण्याची गरज आहे.
– अरुण शेवते