Payal Books
Nirvasit Samasya Ani Sudharit Nagarikatv Kayada By Vibhavari Bidave निर्वासितांच्या समस्या आणि सुधारित नागरिकत्व कायदा
Couldn't load pickup availability
Nirvasit Samasya Ani Sudharit Nagarikatv Kayada By Vibhavari Bidave निर्वासितांच्या समस्या आणि सुधारित नागरिकत्व कायदा
फाळणीचा इतिहास दुःखद आहे. त्याचे परिणाम अजूनच वेदनादायी आहेत. फाळणीनंतर भारताने प्रत्येक नागरिकाला, मग तो कोणत्याही धर्माचे पालन करणारा असो, विकसित होण्याची आणि उत्कर्ष साधण्याची समान संधी देण्याची आपली परंपरा कायम राखली. मात्र भारताचे शेजारील देश गैरमुस्लिम अल्पसंख्याकांना भेदभावाची वागणूक देत आहेत, त्यामुळे हे अत्याचारग्रस्त गैरमुस्लिम अल्पसंख्याक भारतामध्ये स्थलांतर करत आहेत. मात्र भारताच्या नागरिकत्व कायद्याने त्यांना नागरिकत्व मिळणे कठीण होत होते. हे पुस्तक ही पोकळी भरून काढत सामान्य लोकांच्या मनामधील अस्वस्थता दूर करणारे आहे. ह्या पुस्तकाचा परीघ विशाल आहे. फाळणीचा इतिहास, भारतातील विविध निर्वासित आणि त्यांच्याबद्दल भारताने घेतलेली भूमिका, भारतीय आणि विविध जागतिक कायदे, निर्वासितांसंदर्भातील जागतिक परिषदा, नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलनामागचे राजकारण अशा अनेक गोष्टी त्यामध्ये अंतर्भूत आहेत. ज्यांना नागरिकत्व सुधारणा कायदा समजून घ्यायचा आहे, त्यांनी अवश्य वाचावे असे हे पुस्तक आहे. हे पुस्तक म्हणजे नागरिकत्व सुधारणा कायदा आणि संबंधित विषयाची प्रमाणित माहिती देणारा प्रामाणिक स्रोत आहे
