Payal Books
Nirantar Safar
Couldn't load pickup availability
आत्मचरित्र संपले म्हणजे प्रवास संपला असा होत नाही, तर तो प्रवास सुरूच राहतो, असे नमूद करून एक विलक्षण आणि अविश्वसनीय, अद्भुत अशी यात्रा यामध्ये मांडली आहे.
ही जीवनयात्रा चित्तवेधक आणि मनाची कवाडे उघडणारी असून एक नवीन दृष्टिकोन देऊन जाते.
श्री एम यांनी कन्याकुमारी ते काश्मीर 'वॉक ऑफ होप’ ही पदयात्रा केली. त्याद्वारे ‘मानव म्हणून जन्मलो आहोत, मानव होऊन जगा, माणुसकीसाठी प्रत्येक पाऊल उचला!’ हा महत्त्वाचा संदेश दिला आहे.
मुक्ती हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रवास आहे पण जगाचे कल्याण हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. तुम्ही अमर, अकबर, अॅन्थनी कुठलाही आदर्शवाद निवडा. आपण सर्व जण एकच आहोत आणि सारखेच आहोत! हा विचार यात मांडला आहे.
आपण या राष्ट्राचे नागरिक आहोत. आम्ही कोणत्याही अंतर्गत किंवा बाह्य नकारात्मक शक्तींने विभाजित न होता एकत्रितपणे घट्ट राहू! अशा राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश यातून दिला आहे.
