Payal Books
Nigrani |निगराणी Author: Manisha Dixit |मनीषा दीक्षित
Couldn't load pickup availability
ही कथा आहे कमळीच्या असामान्य धैर्याची आणि तिच्या जिद्दीची! मूळच्या ग्रामीण जीवनातून आलेल्या कमळीपाशी ध्यास आहे, तो मुलीला शिकवण्याचा! चांगल्या जीवनाबद्दलचं तिचं भान स्वच्छ आहे. लक्ष्य निश्चित आहे. स्वतःचं शिकण्याचं स्वप्न अपुरं ठेवून संसाराच्या गाड्याला जुंपल्या गेलेल्या कमळीचा, आपल्या हुशार लेकीनं, संगीतानं ते स्वप्न पुरं करावं हा ध्यास आहे. वरकरणी साध्या दिसणार्या तिच्या जीवनात प्रचंड नाट्यमय असं काही नसलं तरी नेटानं ज्यांचा सामना करावा लागेल अशा गोष्टी घडतातच! त्यांच्याशी झुंजताना ती आपला निग्रह सोडत नाही. आपल्या एकुलत्या एक मुलीनं गुणवत्तापूर्ण आयुष्य जगावं यासाठी तिच्या जीवाची घालमेल होते. त्या ध्येयाच्या आड येणार्या प्रत्येक गोष्टीला ती कसून विरोध करते. सगळं बळ एकवटून दोन हात करते. कमळीच्या या सामर्थ्याचं चित्रण म्हणजे ‘निगराणी’!
