Never To Return (Marathi) By Sandy Reid Translated By Sunita Katti
Regular price
Rs. 216.00
Regular price
Rs. 240.00
Sale price
Rs. 216.00
Unit price
per
एका हिरावलेल्या बालपणाची अंत:करण पिळवटून टाकणारी सत्यकथा! समाजकल्याण खात्यानं सँडी रीडला आपल्या ताब्यात घेतलं, तेव्हा तो फक्त एक वर्षाचा होता. त्या वेळी त्याच्या आईला कल्पनाही नव्हती की, तो तिच्या नजरेला जन्मात परत कधी पडणार नव्हता. नेव्हर टू रिटर्न ही स्कॉटलंडमधील टिंकर ह्या भटक्या जमातीत जन्मलेल्या सँडी रीड व त्याची मोठी बहीण मॅगी ह्यांची एक विलक्षण गोष्ट आहे. कोवळ्या वयात त्यांना त्यांच्या आई-वडिलांपासून व विशिष्ट जीवनपद्धतीपासून दूर केल्यानंतर त्यांच्या आयुष्याची काय आणि कशी परवड झाली ह्याची ही गोष्ट आहे. एका हिवाळ्यातील रात्री समाजकल्याणखात्याच्या अधिका-यांनी भटक्या जमातीच्या ह्या लोकांच्या जंगलातील तंबूवर छापा घातला. त्यांच्या छाप्याचा उद्देश होता, त्यांच्या सगळ्यात लहान मुलांना आपल्या ताब्यात घेऊन त्यांना चांगले जीवन देणे, पण त्यांनी विचार केला होता तसे जास्त चांगले आयुष्य ह्या मुलांना मिळालेच नाही. शेवटी तर तो आपल्या ताब्यात असणा-या मुलांचे पद्धतशीर शोषण करणा-या कुप्रसिद्ध ‘अंकल डेव्ह’च्या मगरमिठीत अडकला. या एका पिढीतील मुलांची आयुष्ये कशी उद्ध्वस्त केली गेली, एक संपूर्ण पिढीच आपले बालपण कशी हरवून बसली, याची ही एक धक्कादायक कहाणी आहे. या परिस्थितीवर आणि शोषणावर मात करून एका मुलाने कशी तग धरली, ह्याचेही यात चित्रण आहे.