परिपूर्ण वाटाघाटी तत्त्वांचे एक आकर्षक पुस्तक ‘नेव्हर स्प्लिट द डिफरन्स’ हे ख्रिस वोस (आणि ताहील राझ) या ओलिस वार्ताकाराचे जीवनाच्या वाटचालीत, प्रत्येकाला सर्वार्थाने उपयुक्त ठरणारे पुस्तक आहे. ख्रिस वोस हे आंतरराष्ट्रीय एफबीआय मधील निगोशिएटर आहेत. तसेच प्रतिष्ठित बिझनेस स्कूलमध्ये पुरस्कार विजेते शिक्षक म्हणून ते कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीतून आपले काही अनुभव संकलित केलेले आहेत. त्यातून परिपूर्ण वाटाघाटी तत्त्वांचे एक आकर्षक पुस्तक तयार झालेले आहे. योग्य मानसिकता असणे, ही यशस्वी वाटाघाटीची गुरुकिल्ली आहे. आपले रोजचे जीवन ही वाटाघाटींची मालिका आहे. त्या वाटाघाटीसाठी तुम्ही सदैव तत्पर असले पाहिजे! उदा. कार वा फ्लॅट खरेदी करण्यासाठी वाटाघाटी करणे, वेतन ठरवणे, घर विकत घेणे, भाड्यावर फेरनिविदा करणे, आपल्या जोडीदारासोबत चर्चा करणे, या सार्या गोष्टींमध्ये भावनिक बुद्धिमत्ता आणि अंतर्ज्ञान यांची मोठी जरूरी असते. नेव्हर स्प्लिट द डिफरन्स हे पुस्तक तुम्हाला वाटाघाटीच्या नाजूक जगतात घेऊन जाते.