Neelkanth By Snehal Joshi
Regular price
Rs. 252.00
Regular price
Rs. 280.00
Sale price
Rs. 252.00
Unit price
per
जीवनप्रवासाच्या नानाविध वाटांवर कित्येक माणसं भेटतात. निव्वळ चेह-यावरून तळातला खळाळ हाती लागणं तसं कठीणच! व्यक्ती-व्यक्तींमधले परस्परसंबंध, त्यांच्या वागण्याच्या विलक्षण त-हा, भावनांचे कंगोरे आणि कळत-नकळत उफाळणारे तरंग या सा-याचा मनोज्ञ वेध नीलकंठ कथासंग्रहातून प्रतीत होत राहतो. कायमचं अगम्य असं स्त्री-पुरुष नातं! प्रेम हा एकच शब्द, पण त्याच्याही अनंत छटा! नियतीच्या भोव-यात गटांगळ्या खाणारं आयुष्य आणि त्यात अडकलेलं अवघं मनुष्यजीवन! अशी सगळी घट्ट वीण अलवार उसवून दाखवण्याची लेखिकेची देखणी धडपड चैती, बळीचं तळं, वादळ, मेड फॉर इच अदर यांसारख्या कथांमधून जाणवत राहते. उत्कंठा जागवणा-या, आतला तळ ढवळून टाकणा-या, भ्रम आणि वास्तव यांच्या सीमारेषेवर रेंगाळायला लावणा-या या कथा म्हणजे एक तरल अनुभूती!