{"product_id":"navsahity-ek-abhyas-by-dr-pandit-tapare","title":"Navsahity: Ek Abhyas By: Dr. Pandit Tapare","description":"\u003cp\u003eडॉ. पंडित टापरे हे मराठी भाषासाहित्याचे व्यासंगी प्राध्यापक आणि समीक्षक म्हणून ओळखले जातात. त्यांचा 'नवसाहित्य : एक अभ्यास' (१९८२) हा प्रबंध ग्रंथरूपाने प्रकाशित होत आहे, ही मोठी समाधानाची बाब आहे. नवसाहित्याच्या प्रवाहाने साहित्याच्या अंतरंगात आणि बहिरंगात नवा पालट घडविला. त्यामधून आधुनिक जाणिवांच्या धारा विस्तारित झाल्या. आज नवसाहित्यावरील चर्चाविश्व जरी थोडे अंधुकले असले तरी एके काळी नवसाहित्याच्या चर्चाविश्वाला कमालीचे महत्त्व होते. डॉ. टापरे यांचा हा ग्रंथ नवसाहित्याचे स्वरूप विशद करणारा महत्त्वाचा ग्रंथ आहे. या ग्रंथात नवसाहित्याच्या प्रेरणा, परंपरेबरोबर आधुनिकता आणि प्रयोगशीलतेचे सहसंबंध त्यांनी मर्मज्ञपणे उलगडून दाखविले आहेत. काळ, सामाजिक-सांस्कृतिक परिवर्तने, आधुनिक विश्वदृष्टी, असंगत मानवी दर्शन व नवसाहित्याच्या असांकेतिक आविष्कार रीतीचा त्यांनी घेतलेला परामर्श महत्त्वाचा आहे. तसेच मराठीतील नवसाहित्य विचारांचे अंतरंगही उलगडून दाखविले आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रबंधाच्या दुसऱ्या भागात डॉ. टापरे यांनी मराठीतील नवसाहित्याचे स्वरूप विशद केले आहे. नवसाहित्याच्या संदर्भात प्रातिनिधिक स्वरूपातील महत्त्वाच्या साहित्यकृतींची त्यांनी चिकित्सा केली आहे. त्यामुळे विविध वाङ्मयप्रकारातील नवसाहित्याच्या आविष्काररूपाचा त्यांनी घेतलेला हा शोध संहिताचिकित्सेचा उत्तम नमुनाभ्यास ठरतो. १९४५ ते १९६० व १९६० ते १९८० हे नवसाहित्याचे दोन कालपट कल्पून नवसाहित्याची त्यांनी पाहणी केली आहे. आधुनिक साहित्याची सूक्ष्म वाचन अन्वयार्थाची विश्लेषणदृष्टी टापरे यांच्या विवेचनात आहे. त्यांच्या या विवेचनात ऐतिहासिक पार्श्वभूमीचा वाङ्मयीन तुलनापट सतत हिंदोळत ठेवला आहे. 'पूर्वी'चे आणि 'आत्ता'चे वाङ्मय अशा तुलनेतून नवसाहित्याचे वेगळेपण त्यांनी अधोरेखित केले आहे. प्रबंधाअखेरीस नवसाहित्याला आकार देणाऱ्या घटना-घडामोडीचा दिलेला कालपटही तितकाच महत्त्वाचा आहे. डॉ. टापरे यांची भाषा ही प्रगल्भ आणि वाचनीय स्वरूपाची आहे. त्यामुळे निश्चितच नवसाहित्याविषयीचा हा समीक्षाग्रंथ मोलाचा ठरतो.\u003c\/p\u003e","brand":"Payal Books","offers":[{"title":"Sanskruti Prakashan","offer_id":42643421036737,"sku":"","price":403.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/files\/Tapare1.jpg?v=1685159760","url":"https:\/\/payalbooks.com\/products\/navsahity-ek-abhyas-by-dr-pandit-tapare","provider":"PAYAL BOOKS","version":"1.0","type":"link"}