Skip to product information
1 of 2

Payal Books

Nave Daivat | नवे दैवत by AUTHOR :- Narayan Dharap

Regular price Rs. 132.00
Regular price Rs. 150.00 Sale price Rs. 132.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publications

नारायण धारप हे नाव आताच्या वाचन करणाऱ्या पिढीला नवीन असले, तरीही आपल्या रहस्यमय लेखनाने त्यांनी एक काळ गाजवला होता. गेल्या शतकातील साठच्या दशकात त्यांनी लेखनाला प्रारंभ केला आणि त्यानंतर अखेरपर्यंत ते सातत्याने लिहीत राहिले. दूरदर्शन आणि इतर प्रसारमाध्यमांची फारशी चलती नव्हती, त्या काळात सामान्य वाचक अतिशय आतुरतेने त्यांच्या लेखनाची वाट पाहत असत.
नारायण धारपांच्या कथा ‘भय’ या विकाराची अनेक रूपे घेऊन येतात. कथानकात पुढे काय घडणार याची उत्सुकता कायम ठेवत वाचकाला आपल्या लेखनात गुंतवून ठेवणे, रहस्यमय व गूढ पद्धतीने भयाच्या तावडीत माणसे कशी सापडतात, शारीरिक व मानसिक वेदना कशी भोगतात, भूत-पिशाच्च, क्रूर पीडा देणाऱ्या जीवसृष्टीच्या काल्पनिक जगाचे अस्तित्व कसे जाणवते आणि दैवी शक्तीने, चमत्काराच्या कृपेने त्यातून ती कशी सुटतात याचे वर्णन अतिशय चित्तवेधक आहे.
‘नवे दैवत’ ही कादंबरीही अशीच अनेक रहस्ये उलगडून दाखविते. मानसिक शक्तीचे स्वरूप, विश्वशक्तीशी मानसशक्तीचा संयोग, ती शक्ती पेलण्यासाठी मानसिक धाटणीत आवश्यक असणारे आमुलाग्र बदल या रहस्यमय कादंबरीतून उलगडतात. आपले मन एका नव्या, शुभ्र, पवित्र आणि कल्याणकारी परिसरात प्रवेश करते.
अनेक चित्तथरारक, रोमहर्षक, अकल्पित घटनांनी भारलेल्या व गूढ, रहस्यमय भयचकित साहित्याच्या शोधात असणाऱ्या रसिक-वाचकांची भूक भागविण्याचे काम नारायण धारपांचे साहित्य करते. त्यातच आणखी मोलाची भर टाकणारी ही ‘भय’ कादंबरी.