Payal Books
Nath Sampradayacha Itihas
Couldn't load pickup availability
महाराष्ट्राच्या जडणघडणीत ज्या पंथांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले, त्यामध्ये नाथ पंथ हा अग्रस्थानी होता. ज्ञानेश्वरादि भावंडे नाथसंप्रदायी असल्याने महाराष्ट्रातील जनतेला नाथ संप्रदायाविषयी जाणून घेण्याची उत्सुकता आहे. नाथ संप्रदायाचा उगम, पंथाचे संस्थापक, तत्त्वज्ञान, नवनाथांचे चरित्र, इत्यादीविषयी तपशीलवार, तज्ज्ञ माहिती देणारे पुस्तक. सांस्कृतिक व भाषिक परंपरांचे अभ्यासक, विद्यार्थी आणि सजग वाचकांना वाचनीय ठरणार संदर्भ ग्रंथ.
लेखक डॉ. वा. ल. मंजूळ यांच्याबद्दल
भांडारकर संशोधन संस्था येथील निवृत्त ग्रंथपाल. मराठी हस्तलिखित केंद्र, पुणे या संस्थेचे संचालक. तब्बल १२०० प्राचीन हस्तलिखितांचे संकलन. आजवर २६ प्रकाशित. १० हुन अधिक पुरस्कारांचे मानकरी.
