Nataki Nataka By Kamlakar Nadkarni
मराठी रंगभूमीच्या दुर्लक्षित रूपांचा एक अतिशय उत्कट प्रत्यय कमलाकर नाडकर्णीच्या संग्रहित लेखांतून साकारलेल्या ‘नाटकी नाटकं’ या पुस्तकातून मिळतो. समांतर-प्रायोगिक रंगभूमी, मुख्यधारा-व्यावसायिक रंगभूमी, बालरंगभूमी, कामगार रंगभूमी, दलित रंगभूमी या प्रमुख रूपांपलीकडे डोकावल्यावर कालच्या कालखंडातील महाविद्यालयीन रंगभूमी, राज्यनाट्यस्पर्धा आणि इतर नाट्यस्पर्धा, समीप नाट्य, शारीर नाट्य, परिसर नाट्य, निकट मंच यांसारख्या अनेक मोहक रूपांचा इतिहासही कमलाकरच्या नितळ समीक्षेतून रंजक पद्धतीने उलगडत जातो. त्यामराठी रंगभूमीच्या दुर्लक्षित रूपांचा एक अतिशय उत्कट प्रत्यय कमलाकर नाडकर्णीच्या संग्रहित लेखांतून साकारलेल्या ‘नाटकी नाटकं’ या पुस्तकातून मिळतो. समांतर-प्रायोगिक रंगभूमी, मुख्यधारा-व्यावसायिक रंगभूमी, बालरंगभूमी, कामगार रंगभूमी, दलित रंगभूमी या प्रमुख रूपांपलीकडे डोकावल्यावर कालच्या कालखंडातील महाविद्यालयीन रंगभूमी, राज्यनाट्यस्पर्धा आणि इतर नाट्यस्पर्धा, समीप नाट्य, शारीर नाट्य, परिसर नाट्य, निकट मंच यांसारख्या अनेक मोहक रूपांचा इतिहासही कमलाकरच्या नितळ समीक्षेतून रंजक पद्धतीने उलगडत जातो. त्याच्या शब्दातलं ‘ते 1960 च्या दशकातलं मुंबईतलं नाट्यवातावरण’ ज्या सहजपणे डोळ्यांसमोर उभं राहतं, ते रंगभूमीची नव्याने ओळख होणार्या आजच्या तरुणाईला नक्कीच अचंबित करून टाकेल; त्याच वेळेला, त्या मंतरलेल्या काळाचा साक्षीदार असलेल्या माझ्यासारख्याच्यासुद्धा डोळ्यांच्या कडा नकळत ओलावून जातात, हेही तितकंच खरं!
कमलाकरच्या उदंड नाट्यप्रेमाचे हे तरंग मराठी रंगभूमीच्या वाटचालीच्या एकूण स्वरूपाला डोळस सौष्ठव बहाल करतात. त्यामुळे ‘नाटक बिटक’ प्रांतात करणार्या सगळ्याच नाट्यवेड्यांसाठी हा प्रवास ‘सुखकर’ ठरेल, यात शंका नाही... आणि असा आगळावेगळा नाट्यरूपानुभव दिल्याबद्दल कमलाकरला स्टँडिंग ओव्हॅशन देणं नक्कीच उचित ठरेल!
त्याच्या लेखनात मार्मिक विश्लेषणाबरोबरच एक मिष्कीलताही प्रकट होते. चाळ रंगभूमी, बाल रंगभूमी, प्रायोगिक रंगभूमी आणि व्यावसायिक रंगभूमी या सर्वांचा सम्यक्, रसपूर्ण, अनुभवसिद्ध