Skip to product information
1 of 2

Payal Books

Natak Sangopang | नाटक सांगोपांग by Nilkanth Kadam

Regular price Rs. 684.00
Regular price Rs. 760.00 Sale price Rs. 684.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
publications

नाटकाच्या रसडोळस आकलनाचा जाणता स्पर्श लाभलेले नाटकाविषयीचे हे सांगोपांग विवेचन व विश्लेषण नाट्यसमीक्षेचा भरभक्कम अनुभव देणारे आहे. संहिता वाचन, प्रत्यक्ष प्रयोग आणि अभ्यासपूर्ण निरीक्षणे यांच्या आधारे आस्वादक दृष्टीसह केलेली सप्रमाण मांडणी मराठी नाटकाच्या एका दीर्घ पटाला कवेत घेणारी आहे. नाट्यप्रयोगाच्या दृश्य परिणामाइतकाच नाट्याशयाचा घेतलेला हा प्रभावी वेध नाटककारांची दृष्टी त्यांची बलस्थाने व मर्यादा आविष्कृत करतो. नाट्यानुभव, नाट्यसूत्रे, रचनाबंध, नाटकाची भाषा, समकालीन प्रश्नांचे भान, स्थित्यंतराची दिशा व प्रयोगशीलता या प्रतिपादनाच्या केंद्रस्थानी आणलेली आहे. १९८० नंतरच्या नाट्येतिहासाला पूरक ठरणारी ही मूलगामी चर्चा मराठी नाटकांचे अर्थनिर्णयन व मूल्यमापन यांविषयीची स्वतंत्र मांडणीची भूमिका स्वीकारणारी आहे. नीलकंठ कदम यांच्या ओघवत्या व सहजल लेखनशैलीतून प्रकटणारी त्यांची भूमिका मराठी नाटककार व नाट्यसृष्टी यांविषयी वाचकांना नव्याने चिंतन करायला भाग पाडते व रंगमंचीय आविष्काराचे सजग भान आणून देते. संकल्पनांचा वेध, सूक्ष्म बारकावे, लेखनप्रकारांचे वैविध्य, नाटकाची प्रयोगशरणता आणि संमिश्र कलाप्रकार म्हणून जाणवणारे वेगळेपण यांचा हा ऊहापोह नीलकंठ कदम यांच्या साक्षेपी समीक्षा दृष्टीचे प्रत्यंतर देणारा आहे. वैविध्यपूर्ण दृष्टिकोन प्रकट करणारा हा लेखाजोखा नाटकाच्या दृश्यकलेची अर्थपूर्ण मीमांसा करतो. किंबहुना म्हणूनच या नाट्यसमीक्षेच्या फूटपट्ट्या रूढ चाकोरीला ओलांडणाऱ्या ठरतील, याची खात्री देता येते.