Narayan Murty नारायण मूर्ती BY Ritu Sing
Regular price
Rs. 155.00
Regular price
Rs. 175.00
Sale price
Rs. 155.00
Unit price
per
नारायण मूर्ती यांच्या वैयक्तिक संग्रहातील निवडक छायाचित्रांसह फॉर्च्यून मॅगझिनमध्ये 2012 साली ‘आपल्या काळातील 12 सर्वोत्तम उद्योजकां’मध्ये निवड झालेले नागावरा रामाराव नारायण मूर्ती हे एनआर नारायण मूर्ती नावाने ओळखले जातात. भारतीय उद्योजकांमध्ये मान्यताप्राप्त आणि प्रतिष्ठित असे हे नाव. 1981 साली दहा हजार रुपयांच्या जुजबी भांडवलावर आपल्या सहा व्यावसायिक मित्रांबरोबर मिळून सुरू केलेल्या इन्फोसिसचे ते संस्थापक आहेत, जी इन्फोसिस आता जागतिक सॉफ्टवेअर कन्सल्टींग कंपनी आहे. एनआरएनएम यांनी या कंपनीला फक्त जगातील अव्वल आयटी कंपनीच बनवली नाही तर त्यांनी हेही दाखवून दिले, की मूल्यांमध्ये कोणतीही तडजोड न करता, कोणतेही नियम न वाकवता, नैतिकतेने व्यवसाय करून यश मिळवता येते. हे पुस्तक तुम्हाला अशा एका मुलाच्या चित्तवेधक प्रवासाकडे घेऊन जाते, ज्याने सतराव्या वर्षी, वडलांकडे फी भरण्याचे पैसे नसल्यामुळे प्रतिष्ठित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये मिळालेल्या प्रवेशाचा त्याग केला. जो पुढे जाऊन एका जागतिक माहिती तंत्रज्ञान कंपनीचा प्रमुख झाला. एनआरएन मूर्ती यांच्याकडे पैसा नव्हता, कौटुंबिक पाठींबाही नव्हता. होती ती फक्त जिद्द आणि स्वतःवरचा, व्यवसायाच्या भविष्यावरचा असणारा विश्वास. त्यांच्या संपूर्ण प्रवासामध्ये प्रत्येक ठिकाणी एक घटक नेहमीच होता तो म्हणजे त्यांना त्यांच्या कुटुंबाकडून मिळालेली मूल्ये, जी त्यांनी आयुष्यभर जपली. ती मूल्यं म्हणजे - कष्ट घेण्याची तयारी, नि:पक्षपातीपणा, प्रामाणिकपणा, सभ्यता, पारदर्शकता, उत्कृष्टतेचा ध्यास आणि गुणवत्तेवरील विश्वास. या मूल्यांच्या भक्कम पायावरच इन्फोसिस कार्य करत आली आहे आणि दिवसेंदिवस तिचा उत्कर्ष होत आहे. आदर्श नेतृत्वाचे जीवंत उदाहरण आणि सर्वोत्तम उद्योजक- एनआरएनएम यांच्याकडे वरील सर्वकाही आहेच पण यापेक्षाही बरंच काही आहे. एक असा माणूस ज्याने उद्योगाचा विकास आणि कार्पोरेट गव्हर्नन्सचे नवीन उच्चांक स्थापित केले. रितू सिंग ( प्रेसिडेंट प्रतिभा पाटील, या पुस्तकाच्या लेखिका ) यांनी लिहिलेले हे पुस्तक सर्व वाचकांना निश्चितच प्रेरणादायी ठरेल.