Skip to product information
1 of 2

Payal Books

Nana Phadanvisanche Atmacharitra |नाना फडणविसांचे आत्मचरित्र Author: Dr. Suhasini Irlekar|डॉ. सुहासिनी इर्लेकर

Regular price Rs. 66.00
Regular price Rs. 75.00 Sale price Rs. 66.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publications

मराठ्यांच्या इतिहासातील उत्तर पेशवाईत ‘नाना फडणवीस’ ह्या व्यक्तीने आपल्या बुद्धीसामर्थ्याने अपार कर्तृत्व करून इतिहासात आपले नाव अजरामर करून ठेवले आहे.

ह्या पार्श्वभूमीवर नानांच्या आत्मचरित्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. ह्या आत्मचरित्रात आलेल्या आणि न आलेल्या घटनांचा एकत्रित परामर्श ह्या पुस्तकात घेतला आहे.

एका बाजूला निरपेक्ष, राज्यहितदक्ष, स्वामिनिष्ठ आणि उत्तर मराठेशाहीचा डोलारा सावरणारा मुत्सद्दी, तर दुसर्‍या बाजूला अनैतिक, अनैतिहासिक मजकूर.

ह्या दोन्ही बाजूंची अभ्यासपूर्ण चर्चा येथे नाना फडणविसांचे चरित्र जाणून घेण्यास उपयुक्त ठरेल.

डॉ. सुहासिनी इर्लेकर ह्या कवयित्री व वाङ्मयाच्या अभ्यासक.

नानांच्या आत्मचरित्राचा अभ्यास करताना त्या अनुषगांने आलेल्या नाटकाची व ऐतिहासिक घटनांचीही दखल त्यांनी घेतली आहे.

एकूणच नाना फडणविसांचे चरित्र पुन्हा एकदा तपासून पाहण्यासाठी ह्या पुस्तकाची मदत होईल.