Payal Books
Nahi Nachnar Adivasi Aata | नाही नाचणार आदिवासी आता by हंसदा सौभेन्द्र शेखर | Hansda Sowvendra Shekhar
Regular price
Rs. 133.00
Regular price
Rs. 150.00
Sale price
Rs. 133.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
हाँसदांच्या कथांमधला आणखी एक कमालीच्या धारिष्ट्याचा भाग म्हणजे, त्यांनी हिंदू उच्च वर्णीयांच्या मुजोरीबरोबरीनेच धर्मादाय कामांच्या नावाखाली ख्रिश्चन मिशनऱ्यांनी उभं केलेलं जाळं, त्यांची तथाकथित मूल्यशिक्षण व्यवस्था आणि त्यात फसलेला आदिवासी समाज पुढे आणताना जोल्हे म्हणजेच मुसलमान आणि त्यांनी केलेली घुसखोरी तसंच त्यांचं मूलवासी आदिवासींना अल्पसंख्याक करत नेण्याचं शिस्तबद्ध धोरण, हेही अधोरेखित केले आहे. शिवाय माध्यमांच्या आणि न्यायव्यवस्थेच्या निवाड्यांचाही लेखाजोखा आहेच. थोडक्यात, आपल्या धर्मनिरपेक्ष व लोकशाहीवादी देशाचे चार आधारस्तंभ (विधिमंडळ, प्रशासन, न्यायव्यवस्था, माध्यमे) यांची लक्तरे एकीकडे वेशीवर टांगली आहेत, तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर जाळं असणाऱ्या मिशनऱ्यांचे आणि विस्तारवादी मुस्लिम मानसिकतेचेही वाभाडे काढले आहेत. हिंदूंमधल्या ‘आहे रे’ वर्गाचे दांडगेपण तर आहेच.
