सकस आणि आशयघन कविता करणारे,
तरीही प्रसिद्धीपराङ्मुख असणारे ना. घ. देशपांडे
हे मराठीतील महत्त्वाचे कवी आहेत.
प्रेमकविता, निसर्गकविता, सामाजिक जाणिवेची कविता,
ईश्वर-अध्यात्मविषयक कविता, आत्मचिंतनपर कविता
अशा विविध आशय-वैशिष्ट्यांनी संपन्न असलेल्या
ना. घ. देशपांडे यांच्या कवितांची विस्तृत चिकित्सा
डॉ. नाईकवाडे यांनी आस्वादकाच्या भूमिकेतून केली आहे.
अध्ययन, अध्यापन आणि संशोधनाची शिस्त याला त्यांनी
आपल्या अभ्यासूवृत्तीची जोड दिली आहे.
ना. घ. देशपांडे यांच्या कवितांचे त्यांनी करून दिलेले
नवे आकलन त्यांच्या कवितेवर प्रेम करणार्या रसिकांना
आनंददायी व अभ्यासकांना उपयुक्त ठरेल, हे नक्की.