Payal Books
My Lord माय लॉर्ड By Achyut Godbole
Regular price
Rs. 260.00
Regular price
Rs. 299.00
Sale price
Rs. 260.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
डोळ्यांवर पट्टी, एका हातात तराजू आणि दुसऱ्या हातात तलवार घेतलेली न्यायदेवतेची मूर्ती आपण नेहमी पाहतो.
या मूर्तीकडे पाहिल्यावरच या देवतेचं वेगळेपण लक्षात येतं. इतर देवतांसारखा या देवतेचा एक हात आशीर्वाद
देणारा दिसत नाही. इतर देवांची मायाभरली नजर किंवा जरब बसवणारी दृष्टीही आपल्याला दिसत नाही.
रोमन संस्कृतीमध्ये 'जस्टिशिया'चा सिम्बॉल 'लिब्रा' म्हणजे तराजू मानलं जातं. ही न्यायदेवता अवतरली;
तेव्हा तिच्याजवळ तराजू, तलवार, पुस्तक आणि टॉर्च अशा चार वस्तू होत्या आणि तिनं डोळ्यांवर कापडी पट्टी बांधलेली होती.
फिर्यादीपक्ष आणि बचावपक्ष दोन्ही बाजूंना समान तोलण्यासाठी तराजू, कायद्याची तत्त्वं शोधण्यासाठी सोबत कायद्याचं पुस्तक,
पुरावे योग्य प्रकारे शोधण्यासाठी टॉर्च आणि दिलेल्या न्यायाची कठोर अंमलबजावणी करायची म्हणून हातातली तलवार आहे
आणि तिनं कुणाच्याही प्रभावाखाली येऊ नये, निपक्षपातीपणे न्यायदान करावं म्हणून डोळ्यांवर पट्टी (blind fold) बांधलेली आहे.
