Skip to product information
1 of 2

Payal Books

Mumbai Te Mumbai Bhag 2 By Ajit Vartak मुंबई ते मुंबई भाग २

Regular price Rs. 510.00
Regular price Rs. 599.00 Sale price Rs. 510.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publications

Mumbai Te Mumbai Bhag 2 By Ajit Vartak  मुंबई ते मुंबई भाग २

क्षणोक्षणी समृद्ध जीवन जगणारा अवलिया

अजित बरोबर नाळ जुळण्याचे एक पक्के कारण म्हणजे त्याला जडलेला माणसे जोडण्याचा छंद. काम करताना भरपूर भटकणारी आणि संधी मिळताक्षणी माणसे जोडणारी आम्ही माणसे आहोत. अजितच्या लेखनात मला क्षणोक्षणी जगणारा अवलिया दिसला. या भागात रंजक स्थळांसोबत एकटे किंवा कुटुंबासह परदेशात राहायला गेल्यावर येणाऱ्या आव्हानांचा बडेजाव न करता उल्लेख करतो. त्यातून मार्ग कसा काढायचा याचे डोस न पाजता मार्गदर्शन करतो. कमाल गोष्ट म्हणजे परदेशातसुद्धा वेळात वेळ काढून गणेशोत्सव असो की हिंदू स्वयंसेवक संघाची शाखा असो सगळ्यात समरसून सहभागी होतो.

इंग्लंडमधील वास्तव्यात अजितने केवळ मधु अभ्यंकर, अनिल नेने, वासुदेव गोडबोले यांना आपलेसे केले असे नाही तर विव हुलँड या ब्रिटिश लँड लेडीसोबत नातेसंबंध जुळविले, ती कहाणी तर अजब आहे. अजितसारखी काही मोजकी माणसे वेळेच्या पूर्ण नियोजनामुळे आणि माणसे जोडण्याच्या छंदामुळे समृद्ध जीवन जगतात. नुसतेच जगात नाहीत तर 'मुंबई ते मुंबई' या दोन भागाच्या पुस्तकातून आलेले अनुभव जगासमोर प्रभावी आणि रंजक पद्धतीने मांडतात. अजितच्या पुढील भटकंती आणि लेखनाला अनेक शुभेच्छा!
- सुनंदन लेले