Payal Books
Mumbai Te Mumbai Bhag 1 By Ajit Vartak मुंबई ते मुंबई भाग १
Couldn't load pickup availability
Mumbai Te Mumbai Bhag 1 By Ajit Vartak मुंबई ते मुंबई भाग १
र्तकांची फिरस्तेगिरी हा त्यांच्या जीवननिष्ठेचा भाग
श्री. अजित वर्तक यांनी आपल्या फिरस्तेगिरीवर लिहिलेलं 'मुंबई ते मुंबई' हे पुस्तक (दोन भागांत) रोचक आणि वाचनीय आहे. प्रवासाची हौस सगळ्यांना असतेच; पण प्रवास हा वर्तकांच्या जीवननिष्ठेचा भाग आहे.
वर्तकांच्या प्रवासाचा पट मोठा आहे. नोकरीनिमित्तानं देशविदेशाची मुशाफिरी त्यांना घडली. तसंच, मित्र नि कुटुंबीयांसह देखील त्यांनी मनसोक्त भटकंती केली. ते सगळे अनुभव त्यांनी सोप्या नि रसाळ शब्दांत मांडलेत. चार मित्रांच्या मैफलीत बसून वर्तक आपले प्रवासकिस्से सांगताहेत, असा लिखाणाचा एकूण ऐसपैस बाज आहे. हे या पुस्तकाचं मोठं यश आहे.
अजित वर्तक यांचं हे पहिलंच पुस्तक. वाचक खुल्या मनानं 'मुंबई ते मुंबई'ला हिरवा कंदिल दाखवतील आणि वर्तकांचा पुढचा लेखनप्रवास निर्विघ्न आणि आनंददायी होईल, असा विश्वास वाटतो.
- अंबरीश मिश्र
***
अनुभव संपन्न करणारा प्रवास
श्री. अजित वर्तक लिखित 'मुंबई ते मुंबई' हे पुस्तक वाचल्यानंतर 'प्रवास माणसाला शिकवतो, घडवतो आणि नवी आव्हाने पेलण्याची ताकद देतो', याची प्रचिती आपल्याला येते. लेखकाचा मित्र परिवार मोठा आहे आणि कॉलेजच्या दिवसांपासून सुरू झालेल्या भटकंतीमधून देशातील विविध शहरे, निमशहरे आणि गावे यांना भेट देत आपल्या गाठीशी अनुभवांची शिदोरी गोळा केली. डायरीमध्ये अनुभव नोंदवण्याच्या लेखकाच्या सवयीमुळे १९९२ ते २०२२ असा तीस वर्षांचा प्रदीर्घ काळ त्यांनी आपल्यासमोर उत्तम उभा केला आहे.
इतिहास, राजकारण, समाजकारण, खेळ अशा अनेक क्षेत्रात लेखकाची भटकंती आहे आणि प्रवासात सोबत भेटलेल्या विविध प्रांतातील लोकांचे बारकाईने निरीक्षण करणे हा लेखकाचा आवडता छंदच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचाराने प्रेरित झालेले लेखक विविध राज्यातील प्रवासा दरम्यान संघाच्या कार्यालयाला आवर्जून भेट देतात. एखाद्या ठिकाणाला भेट द्यायची ठरले की आयटेनरी कशी बनवावी, तेथे कसे जावे, इथपासून तिथे काय काय पहावे, प्रवासाचे नियोजन कसे करावे हे जाणून घेण्यासाठी हे पुस्तक नक्की वाचायला हवे.
- जयराज साळगावकर
