PAYAL BOOKS
Mumbai Gangwar Kalkhanda 2 मुंबई गँगवॉर : कालखंड दुसरा अजय ताम्हणे
Couldn't load pickup availability
Mumbai Gangwar Kalkhanda 2 मुंबई गँगवॉर : कालखंड दुसरा अजय ताम्हणे
वर्चस्ववादातून फरीदखान गंगने मुनीरवर रात्रीच्या शांततेत पेट्रोल पंपावर गोळ्यांची बरसात केली… मात्र मुंबईचा ‘बेताज बादशहा’ होण्यासाठी त्याला आणखी एकाला मारण्याची गरज होती…. कोण होता ‘तो’…? मुंबईचा बेताज बादशहा कोण बनणार? मुनीरच्या म्हणजेच आपल्या भावाच्या हत्येचा बदला ‘तो’ घेणार का ?
सोन्याची लंका समजल्या जाणाऱ्या मुंबई महानगरीत स्मगलिंग, ड्रग्ज आणि दारूचं बीज रोवून इंग्रज निघून गेले. पुढे हैदरअली ऊर्फ बडे अंकल, रुस्तमखान पठाण ऊर्फ लाला आणि शंकरन मणियार ऊर्फ अण्णा या तिघांनी त्यांच्या ‘डोकॅलिटी’ आणि दहशतीच्या जोरावर या बीजाचं वटवृक्षात रूपांतर केलं. तिघं जण मुंबईतल्या अवैध धंद्यांचे बादशहा बनले. आपली बादशाही टिकवण्यासाठी हैदरअलीने मुनीर गँगला, लालाने फरीदखान गँगला आणि माटुंग्याच्या अण्णाने चेंबूरच्या निरंजन नायरला आपल्या छत्रछायेखाली घेतलं. जवानीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या मुनीर, फरीद आणि निरंजन यांनी त्यांच्या ताकदीच्या जोरावर गडगंज पैसा कमावला.
आणीबाणीनंतर या तीनही डॉनने काळ्या धंद्यातून निवृत्ती घेतली. मात्र या तिघांनी तयार केलेले राक्षस मुंबईत भविष्यात गँगवॉर करून राडा घालणार होते…
भाई लोकांच्या जिंदगीच्या खऱ्याखुऱ्या कॅनव्हासचं उलगडणं पुढे चालू…

