PAYAL BOOKS
Mumbai Gangwar By Ajay TAmhane मुंबई गँगवॉर अजय ताम्हणे
Couldn't load pickup availability
Mumbai Gangwar By Ajay TAmhane मुंबई गँगवॉर अजय ताम्हणे
ही कथा आहे मुंबईची… मुंबईने पाहिलेल्या एका काव्याची. राक्षसी महत्त्वाकांक्षेची, मुंबईवर राज्य केलेल्या भाईलोकांची, त्यांच्या प्रतिस्पर्ध्याची… त्यातून निर्माण झालेल्या वैमनस्याची, खूनबाजीची आणि हे थांबवण्यासाठी जीवावर उदार होऊन आपले कर्तव्य बजावणाऱ्या जिगरबाज पोलीस अधिकाऱ्यांची, त्यांचा लगाम हाती धरणाऱ्या राजकारण्यांची…
ही गोष्ट आहे सोन्या-चांदीच्या स्मगलिंगची, पाकीटमार- ब्लॅकरवाल्यांची, मटका जुगारवाल्यांची, वेश्याव्यवसाय करणाऱ्या पोरींची, दलालांची, धारावीतल्या चुलीवर रटारटा उकळणाऱ्या हातभट्टीची आणि चामड्याच्या गोदामात लपवलेल्या चरस-गांजाची…
ही गोष्ट आहे शॉटकट मारून मोठी स्वप्नं पाहणाऱ्या माणसांची…
ही गोष्ट आहे भरडल्या गेलेल्या मुंबईतल्या सामान्य कुटुंबांची…
“जगण्याचा संघर्ष ‘खल्लास’ करण्यासाठी पाहिजे पैसा… खूप सारा पैसा आणि तो सरळ मिळत नाही, त्यासाठी पावले वाकडी टाकावी लागतात,” अशा समजुतीतून उभा राहतो काळा धंदा आणि हा धंदा कितीही ‘गंदा’ असला तरी तो करण्याची लत एकदा लागली की त्यातून सुटका नाही !
वरवर फिक्शन वाटणारी, पण नकळतपणे तुम्हाला वास्तवाच्या समोर उभी करणारी कादंबरी… मुंबई गँगवॉर!
