Mulanvarche Sanskar By S V Kashyape
Regular price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Sale price
Rs. 135.00
Unit price
per
मुलांनो जीवन म्हणजे विविधरंगी अनेक धाग्यांनी विणलेला गोफ, तो सुंदर रीतीने गुंफण्यासाठी आपल्या आचार-विचार-भावनांचे धागे मजबूत, मुलायम, आकर्षक तर हवेतच; पण ते कलात्मक पद्धतीने गुंफलेही गेले पाहिजेत. आपला जीवनगोफ असा सुसंस्कारित, सुंदर, आकर्षक, मजबूत होण्यासाठी या पुस्तकात वाचा- आपल्या धार्मिक परंपरा, देवाचं स्वरूप, प्रार्थना, उपवास, व्रत यांचा अर्थ व त्यांनुसार आपलं वर्तन यांचा उहापोह. विविध सणवारांचे उद्देश, ते साजरे करण्याची पद्धती व आधुनिक काळानुसार करावयाचे बदल यांचं स्पष्टीकरण. खरं शिक्षण, शिक्षणाचं माध्यम, सुट्या, सहशिक्षण, जीवनध्येय व शिक्षण यांच्या सांगडीसंबंधी विचार. मौज, लग्न यांसारख्या धार्मिक संस्काराचा खरा अर्थ, स्वरूप व उपयोग यांचं विवरण. सामाजिक चालीरीती, जातिधर्मभेद, संबोधनाचे प्रकार, अभिवादनाचे प्रकार, मुलामुलींना समान वागणूक, भांडावं कसं, यांचं विवेचन. आपलं राष्ट्र, राष्ट्रीयत्व, लोकशाही व मताधिकार, राष्ट्रीय गुण व दोष यांचं दिग्दर्शन. रोजगार, नोकरी, बेकारी व त्यांवरील उपाय यांचा परामर्श. धर्माचा खरं अर्थ, अध्यात्म व कर्मयोग, यज्ञाचा अर्थ व विविध प्रकार, खरं सुख, जीवनाचं तत्त्वज्ञान यांचा मुलांना समजेल, अशा भाषेत परिचय. पालकांनो, आपल्या मुलांवर सुसंस्कार कसे करावेत, त्यांच्या विविध विषयांवरील प्रश्नांना समर्पक उत्तरे कशी द्यावीत, जुन्या परंपरा व नवीन विचारधारा यांची सांगड कशी घालावी, मुलांपुढे आपला आदर्श कसा उभा करावा, हे समजण्यासाठी या पुस्तकाला अवश्य वाचा.