PAYAL BOOKS
Muktyarisambharambh By Balaji Karvade मुक्त्यारीसमारंभ
Couldn't load pickup availability
Muktyarisambharambh By Balaji Karvade मुक्त्यारीसमारंभ
आपण साक्षीदार असलेल्या महत्त्वाच्या घटना किंवा त्याबद्दलच्या हकिकती लिहून ठेवणे ही सवय भारतीयांत फारशी आढळत नाही. यामुळे भारताचा इतिहास शोधताना विदेशी व्यक्तींनी लिहून ठेवलेल्या हकिकती हा आपल्या इतिहासाचा फार मोठा आधार मानला जातो. याचं उदाहरण द्यायचं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासारखी अभूतपूर्व घटना आपल्याला हेन्री ऑक्झेंडन या ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्याने लिहिलेल्या डायरीच्या आधारे समजून घ्यावी लागते.
राजर्षी शाहू महाराजांचा राजकीय आणि सामाजिक क्षितिजावर उदय होणे ही 20व्या शतकाच्या पूर्वार्धात घडून आलेली अतिशय महत्त्वाची घटना होती आणि तख्तारूढ छत्रपती म्हणून राजर्षी शाहू महाराजांकडे समाजाचे नेतृत्व जाणे हे अतिशय सुसंगत होते. या सर्व स्थित्यंतराची नांदी मानता येईल, अशी घटना म्हणजे त्यांचे राज्यारोहण.
2 एप्रिल 1894 रोजी पार पडलेल्या या ऐतिहासिक सोहळ्याचे एका प्रत्यक्षदर्शीने केलेले वर्णन नव्या संशोधित आणि संपादित रूपात वाचकांसाठी आणि इतिहास अभ्यासकांसाठी प्रस्तुत पुस्तकाच्या रूपाने उपलब्ध होत आहे.
