Mukhavate By V S Khandekar
Regular price
Rs. 99.00
Regular price
Rs. 110.00
Sale price
Rs. 99.00
Unit price
per
माणसानं दृष्टी गमावली की तो अन्तर्मनाने जग पाहू लागतो. वि. स. खांडेकरांचंही असंच झालं. सन १९७३ ला त्यांची दृष्टी गेली. तरी ते लिहीत राहिले. ‘मुखवटे’मधील निबंध याच काळातील. ‘साप्ताहिक स्वराज्य’मध्ये लिहिलेले हे निबंध म्हणजे एका संवेदनाशील मनानी माणसाच्या जीवनाचा घेतलेला धांडोळाच! या धांडोळ्यातून ते गतकाळाचा ताळेबंदच मांडतात. त्यांच्या लक्षात येतं की जग हा एक मुखवट्यांचा बाजार आहे. मुखडे नि मुखवट्यांची ही तर बंदिशी! ‘मुखवटे’ लघुनिबंध संग्रह म्हणजे माणसाच्या खयाखोट्या प्रतिमा दाखविणारा आगळा आरसाच! वाचक यात स्वत:स डोकावून पाहील तर त्यास आपला मुखडा दिसेल आणि ‘मुखवटे’ही!