Skip to product information
1 of 2

Payal Books

Mughal Samrat मुघल सम्राट by Shriram Sathe श्रीराम साठे

Regular price Rs. 1,100.00
Regular price Rs. 1,350.00 Sale price Rs. 1,100.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publications

Mughal Samrat मुघल सम्राट by Shriram Sathe श्रीराम साठे

'ज्याच्या ताब्यात दिल्ली, त्याच्या हाती हिंदुस्थानची किल्ली' हा पुरातन सिद्धांत कृतीत आणण्यासाठी 'आज राजा तर उद्या रंक,' 'आज अमीर तर उद्या फकीर' या यशापयशाच्या चक्रात फिरणारा तुकीं व मुघल वंशाचा पुत्र बाबर मध्य आशियातून वैभवसंपन्न हिंदुस्थान जिंकून घेण्यासाठी आला आणि जेत्याच्या अभिनिवेशात दिल्लीत त्याने 'मुघल तख्ताची' स्थापना केली....

... बाबर पर्व समाप्तीनंतर तख्तावर आलेल्या बाबराच्या कर्तृत्ववान वारसांनी संपूर्ण हिंदुस्थान पादाक्रांत करण्यासाठी एक देश, एक सम्राट, एक भाषा, एक चलन, एक धर्म, सर्वधर्मसमभावाची जोपासना व रोटीबेटीचे धोरण अंगिकारले...

'सुलाह-ई-कुल' (सलोख्याची वृत्ती) अंगिकारून मुघल साम्राज्याचे स्वरुप 'दार-उल्-हर्ब' (युद्धाचे क्षेत्र) व 'दार-उल्-इस्लाम' (शांतीक्षेत्र) ठेवले. शरीयत कायद्याच्या आधारे मुघल साम्राज्यात 'दस्तूर-उल्- अलम' (व्यवहाराचे नियम) निश्चित केले. बादशाह म्हणजे 'जिल्लुल्लाह' (परमेश्वराची छाया), 'सिफाते कुटुसी' (दैवी गुणांची खाण) असून त्याचा दरबार म्हणजे 'नमुना-ई-दरबार-ईलाही' (ईश्वराच्या दरबाराचा नमुना) हे रयतेच्या मनावर ठसविले...

.... रयतेच्या उन्नतीसाठी वास्तू रचनाकार, अभियंते, वाङमय निर्माते, तत्त्वज्ञ, कवी, चित्रकार, कलावंत, गायक, नर्तक, भाषांतरकार व उद्योजकांना राजाश्रय दिला. मुघल वास्तुशास्त्रात 'सहन-इ-इबादत' (धार्मिक संकुल), 'सहन-इ-खास' (शाही इमारती) व 'सहन-इ-रयत' (दरबारी इमारती) यांच्या समावेशाने दगडातून काव्य निर्माण केले... ...सम्राट औरंगजेबाने साम्राज्य विस्तारासाठी कट्टर स्वधर्माभिमानाची कास धरून आपली राज्य निष्ठा 'जिहाद'शी निगडीत केल्याने सर्वधर्मीय पंथात तेढीचा वणवा पेटला आणि त्यात मुघल साम्राज्याची प्रगती भस्मसात झाली

..... उत्तरकालीन मुघल सम्राटांच्या हाती सर्व अनुकुलता असूनही शाही डामडौल, द्वेष, खूनखराबा, सुस्त प्रशासन, रणांगणावर जाण्याचा आळस, दीर्घसूत्री विचारधारणा व स्वधर्माच्या अति प्रेमापायी दूरगामी घटनांचेअ वलोकन करता न आल्याने मुघल साम्राज्याचा गाडा पारतंत्र्याच्या उंबरठ्यावर येऊन धडकला..

. .... सन १८५७च्या स्वातंत्र्य समरात सम्राटाच्या हाती नेतृत्त्व असूनही मुघल सम्राटाचा पराभव इंग्रजांनी केला आणि ३३१ वर्षांची परंपरा असलेले 'मुघल साम्राज्य' बरखास्त केले...