Mudda karne yancha Anuvadit set
मुग्धा कर्णिक यांनी अनुवादित केलेल्या प्रसिद्ध पुस्तकांचा संच सवलतीत १३५०/- घरपोच डिलिव्हरी
* देव नावाचा भ्रम
रिचर्ड डॉकिन्स अनुवाद- मुग्धा कर्णिक
किंमत ५००/-
इंग्रजीतील प्रसिद्ध आणि बेस्टसेलर लेखक रिचर्ड डॉकिन्स यांचं ‘द गॉड डिल्यूजन’ हे प्रचंड लोकप्रिय झालेलं आणि जगभरातल्या अनेक भाषांमध्ये अनुवादित झालेलं पुस्तक. या पुस्तकाचा मराठी अनुवाद प्रा. मुग्धा कर्णिक यांनी केला असून मधुश्री पब्लिकेशने हे पुस्तक प्रकाशित केले आहे
* शॅडो आर्मीज्
धीरेंद्र के. झा. अनुवाद धनंजय कर्णिक , मुग्धा कर्णिक
किंमत ३००/-
शॅडो आर्मीज्
काठावरच्या संघटना आणि हिंदुत्वाचे पायदळ
* जुलुमशाहीविषयी - प्रा. टिमथी स्नायडर
किंमत :- २५०/-
इतिहासाची जशीच्या तशी पुनरावृत्ती होत नसली तरीही इतिहास आपल्याला खूप काही शिकवू शकतो. विसाव्या
शतकात युरोपीयन लोकशाही राष्ट्रे कोलमडून गेली आणि नाझीवाद, फाशीवाद तसेच साम्यवादाच्या जुलमी पकडीत सापडली. या साऱ्या चळवळींचे एकेक सर्वेसर्वा नेते होते, आणि ते सारे स्वतःला लोकांचा एकमेव आवाज समजत होते, त्यांचे जागतिक संकटापासून रक्षण करण्याचा दावा करत होते, दंतकथा रचताना विवेकाला पायदळी तुडवत होते. युरोपीय इतिहासातून आपल्याला दिसून येते एक स्पष्ट चित्र- समाज कसे विदीर्ण होत जातात, लोकशाही व्यवस्था कशा ढासळत जातात, आणि सर्वसामान्य लोक अकल्पनीय अशा भीषण परिस्थितीत कसे सापडतात. इतिहास आपल्याला या साऱ्याची ओळख करून देतो, सावध करतो. विसाव्या शतकात लोकशाही व्यवस्थांचे बळी देऊन जुलूमशाहीला शरण जाणाऱ्या युरोपीय लोकांहून आपण फारसे शहाणे झालेलो नाही. पण राजकीय व्यवस्था पांगळी झालेली असताना निदान आपल्याकडे एकच जमेची बाजू आहे की या काळात आपण जुलुमशाहीची पुढे पडणारी पावले रोखू शकतो. हीच वेळ आहे.
* आय एम ट्रोल ( I AM TROLL )-
स्वाती चतुर्वेदी , अनुवाद : मुग्धा कर्णिक
किंमत २५०/-
* रीयुनियन - फ्रेड उल्मान
किंमत २००/-
फ्रेड उल्मान: जर्मनीतील शटुटगार्ट येथे जन्मलेल्या फ्रेड उल्मानला वयाच्या बत्तीसाव्या वर्षी स्वदेश सोडावा लागला. तो चित्रकार होता, कवी होता आणि उदरनिर्वाहासाठी कायद्याचे उच्चशिक्षणही त्याने घेतले होते. हिटलर जर्मनीचा चॅन्सेलर होताचं दोनच महिन्यात त्याने देश सोडला. फ्रांस, स्पेन या देशांत नशीब आजमावत तो अखेर ब्रिटनमध्ये स्थिरावला. युद्धाला तोंड फुटल्यावर शत्रू राष्ट्राचा नागरिक म्हणून ब्रिटनने त्याला सहा महिने तुरुंगवासात टाकले. पण त्यानंतरचे त्याचे आयुष्य ब्रिटनमध्ये कलावंतांच्या सहवासात गेले. चित्रकार म्हणून तो ख्याती पावला. त्याची चित्रे ब्रिटनमधील अनेक संग्रहालयांत प्रदर्शित केलेली आहेत. रीयुनियन हि त्याची कांदबरिका प्रसिद्ध झाल्यावर दुर्लक्षित राहिली. परंतु मध्ये ती पुनः प्रकाशित झाली तेंव्हा ऑर्थर कोस्लरच्या नजरेत आली, आणि मग यशस्वी ठरली.
युनियन नाझी जर्मनीच्या त्या कालखंडाचा विचारही नकोसा वाटतो. त्याच कालखंडात घडते कॉन्राडिन आणि हॅन्स या दोन मित्रांच्या अधुऱ्या मैत्रीची गोष्ट. द्वेषपूर्ण राजकीय परिस्थितीतील जर्मनीमध्ये घडलेल्या आणि बिघडलेल्या या मैत्रीची कथा, बऱ्याच काळानंतर कधीतरी पुनर्भेट होऊन पूर्ण होते. एक आगळी, चटका लावणारी पुनर्भेट, फ्रेड उल्मानची ही नाजूक जिवाची कांदबरिका अनुवादित केली आहे
डॉ. मुग्धा कर्णिक यांनी.....