Skip to product information
1 of 2

Payal Books

Mr and Mrs Jinnah (Marathi) Author : Sheela Reddy

Regular price Rs. 404.00
Regular price Rs. 450.00 Sale price Rs. 404.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publications

मोहम्मद अली जिना हे अत्यंत यशस्वी बॅरिस्टर आणि राष्ट्रीय चळवळीतील उगवता देदीप्यमान तारा होते. त्यांनी 18 वर्षं पूर्ण झालेल्या रट्टीशी विवाह केला. रट्टी पेटिट ही जिनांचे मित्र सर दिनशॉ पेटिट यांची कन्या होती. या विवाहानंतर समाजानं जिना आणि रट्टी यांना वाळीत टाकलं.
सहजासहजी भावना प्रकट न करणारे आणि भिडस्त स्वभावाचे जिना त्यांच्या सुरेख, चंचल, अल्पवयीन शिशुपत्नीशी अत्यंत निष्ठेनं, प्रेमानं वागत असत. रट्टी अत्यंत करड्या स्वभावाच्या जिनांची चेष्टा-मस्करी आणि त्यांच्याकडे आर्जव अगदी सहज करू शकत असे; परंतु जसजशा वादळी राजकीय घटना जिनांचं चित्त अधिकाधिक गुंतवून ठेवू लागल्या, तसतसा रट्टीचा एकटेपणा वाढू लागला. आपले कुटुंबीय, मित्र आणि समाज यांपासून तोडली गेलेली रट्टी अतिशय एकाकी पडली. अवघ्या एकोणतिसाव्या वर्षी ती मरण पावली. मागं राहिली तिची मुलगी दिना आणि सांत्वनापलीकडे दु:खित होऊन पुन्हा कधीही विवाहाकडे न वळलेला तिचा पती!
इतरांच्या कधीही दृष्टीस न पडलेला रट्टीचा आणि तिच्या स्नेह्यांचा पत्रव्यवहार; समकालीन व्यक्तींनी आणि मित्रमंडळींनी केलेल्या वर्णनांचा दस्तावेज या पुस्तकात रेखाटला आहे.