तुमच्या आयुष्याचे स्वप्न विस्तृत करा आणि नैसर्गिक ऊर्जेचा एक अगदी नवीन दर्जा अनुभवा.
आयुष्याच्या एका स्वप्नासोबत तुम्ही अपेक्षेने जागे होता. सकारात्मकतेच्या मानसिक कणखरतेमुळे तुम्ही प्रत्येक आव्हानाला सामोरे जाता. तुम्ही कोणत्या मार्गाने जात आहात हे तुम्हाला माहीत असते. एखाद्या स्वप्नाशिवाय, रात्री शक्य तितक्या उशिरा झोपणे सामान्य लक्षण आहे, दिवसभरात झालेल्या गोष्टींचा आढावा घ्या आणि थकलेल्या अवस्थेत स्वतःला आजचा नित्यक्रम उद्या पुन्हा घडावा यासाठी बिछान्यावर झोकून द्या. मोठ्या स्वप्नांची जादू अशा लोकांसाठी आहे ज्यांना नैसर्गिक ऊर्जेचा पुरवठा करणाऱ्या आपल्या महत्त्वाच्या स्वप्नांना प्रत्यक्षात उतरवण्याचे वेड आहे.
तुमचे जीवन-स्वप्न कदाचित इतके मोठे असू शकते की, त्याचा समावेश एका छोट्या आयुष्यात किंवा एकट्याने तेथपर्यंत पोहोचण्यासाठी केला जाऊ शकत नाही. मोठ्या स्वप्नांची जादू तुम्हाला असा संघ तयार करण्यास शिकवते जो तुमचे स्वप्न विभागून घेईल, त्याला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवेल आणि त्याचा पुढच्या पिढीवरही प्रभाव पाडेल.
“…ज्यांना बदल हवा आहे अशा प्रत्येकाने हे पुस्तक वाचलेच पाहिजे!”
– बेट इज्ले, ऑटो झोन संस्थेचे उपाध्यक्ष
“तुमच्या भविष्यावर प्रभाव पडणार आहे…”
– पॅट विल्यम्स, ऑरलॅन्डो मॅजिक, वरिष्ठ उपाध्यक्ष
“…प्रत्येकाला विशिष्ट उंचीवर ठेवण्यास आणि संघटनेला सामान्यत्वाच्या पलीकडे नेण्यास मदत करू शकते.”
– रिच डेव्होस, ससंस्थापक, अॅल्टिकोर आणि ओनर, एनबीए ऑरलॅन्डी मॅजिक
“ज्यांना आपल्या जगण्यात गतिशीलता आणायची आहे त्यांनी वाचायलाच पाहिजे असे हे पुस्तक आहे.”
-डॅन टी. कॅथी, चिक-फिल-ए संस्थेचे अध्यक्ष आणि मुख्य ऑपरेटिंग अधिकारी
“..यशस्वी व्यवसायासाठी आणि यशस्वी आयुष्यासाठी ही एक रूपरेखा आहे.”
– बॉब बर्ग, एन्हलेस रेफरल्स या पुस्तकाचे लेखक