Moharam मोहरम by Hansraj Jadhav हंसराज जाधव
Moharam मोहरम by Hansraj Jadhav हंसराज जाधव
हंसराज जाधव यांच्या ‘मोहरम’ या संग्रहातील कथांमध्ये आशयसूत्रांची विविधता आहे. शेतकरी चळवळ, सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न, कौटुंबिक नात्यांमधील घालमेल असे असंख्य विषय सघन अशा तपशीलांसह या कथांमध्ये येतात. ग्रामीण भागातील सांस्कृतिक बहुविधता, महानुभव पंथीयांची परंपरा, लोकश्रद्धा, शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्यांची अस्वस्थता या संदर्भातले असंख्य अनुभव या संग्रहातील कथांमध्ये तपशीलवारपणे आलेले आहेत. ज्या अनुभवांच्या आधारे ही कथा गुंफली जाते ते अनुभव वाचकांच्या मनाला भिडतात, अस्वस्थ करतात. आटोपशीरपणा आणि स्वतःची भाषा घडवण्यासंदर्भात विचार केल्यास हंसराज जाधव यांची कथा आणखी टोकदार वाटू लागेल. तशा शक्यता या कथासंग्रहात जाणवतात. कथा या प्रकाराची त्यांची समज लक्षात घेता पहिल्याच संग्रहात त्यांनी मोठ्या अपेक्षा निर्माण केलेल्या आहेत. या कथांचे मनःपूर्वक स्वागत !
– आसाराम लोमटे