Metroman Shridharan By M. S. Ashokan
भारताच्या नागरी वाहतूकसेवेचा चेहरामोहरा पालटून टाकणार्या एका निष्ठावान अभियंत्याची…ई.श्रीधरन यांची ही कर्तृत्वगाथा !
अनेक आव्हानात्मक प्रकल्पांतील त्यांच्या कार्यशैलीमुळे श्रीधरन यांचं नाव पारदर्शकता, काटेकोरपणा आणि कार्यक्षमता या गुणांशी समानार्थी बनलं.
अशक्यप्राय वाटणाऱ्या प्रकल्पांना श्रीधरन यांचा `मिडास टच’ लाभला आणि `कोकण रेल्वे’, `दिल्ली मेट्रो’ यांसारखे अवाढव्य प्रकल्प जलदगतीने साकारले गेले. कोची मेट्रो प्रकल्पाची धुराही त्यांच्याकडे आली. भारतीय रेल्वे सेवा, `कलकत्ता मेट्रो प्रकल्प’ यांतही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
असे अवघड प्रकल्प कार्यक्षमतेने साकारताना त्यांचा दिवसातील काम करण्याचा अवधी असायचा फक्त आठ तास…त्यांच्या कार्यशैलीचं हे आणखी एक वैशिष्ट्य!
अत्याधुनिक तंत्रज्ञानाला इच्छाशक्ती आणि पराकोटीची कर्तव्यनिष्ठा यांची जोड मिळाली तर `मिरॅकल्स’ घडू शकतात, असा विश्वास देणारा हा प्रेरक कर्तृत्वपट मेट्रोमॅन श्रीधरन…