Payal Books
Menducha Password - Dr. Shruti Panse
Couldn't load pickup availability
"माणूस इतर प्राण्यांपेक्षा वेगळा आहे याचं कारण त्याचा प्रगतिशील मेंदू आहे." हे विधान जितकं सोप्पं तितकंच पूर्णतः समजून घेणं कठीण.
इतकी वर्षं न समजलेला मेंदू आत्ता कुठे मेंदू तज्ज्ञांना थोडा थोडा समजू लागला आहे.
सर्वसामान्य व्यक्तीलाही मेंदूविषयी कुतूहल वाटतंच...
मेंदू आणि मन वेगळं असतं का? मन म्हणजे मेंदू? की हृदय? की दोन्ही? विचार आणि भावना वेगळ्या आहेत का?
माणसाचा एवढा लहानसा मेंदू एवढ्या वेगवेगळ्या गुंतागुंतीच्या क्रिया कसा करतो? शास्त्रज्ञांचा / कलावंतांचा / खेळाडूंचा मेंदू वेगवेगळा असतो का?
असे प्रश्न आपल्यालाही पडतातच ना...
अशा अनेक प्रश्नांविषयी सोप्या भाषेत शास्त्रीय माहिती देणारे पुस्तक
आणि या बरोबरच
आपल्या भावना समजून घेण्यासाठी...
आवश्यक ते बदल स्वतःत घडवण्यासाठी...
वेगवेगळ्या वयातलं आपलं मूल समजून घेण्यासाठी...
आपल्या आजूबाजूच्या वेगवेगळ्या व्यक्ती, त्यांच्यासोबत असलेली आपली नाती समजून घेण्यासाठी...
अखेरच्या श्वासापर्यंत आपला मेंदू तल्लख राहण्यासाठी...
विचारांची आणि कृतीची दिशा देणारे पुस्तक
लेखकाविषयी :
डॉ. श्रुती पानसे शिक्षण सल्लागार, शिक्षण संशोधक, समुपदेशक, प्रशिक्षक आहेत.
सोप्या भाषेत शास्त्रीय माहिती देणाऱ्या अनेक पुस्तकांचे लेखन.
"मेंदू आणि शिक्षण" या विषयात शिक्षणशास्त्रात पीएच.डी..
"मेंदू समजून घेताना... " या विषयावरील अनेक संशोधन निबंध प्रकाशित.
"न्यूरॉन्स अॅक्टिव्हिटी अँड रिसर्च सेंटर"च्या संस्थापक संचालक.
'बहुरंगी बुद्धिमत्ता' या पुस्तकाला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई यांच्यातर्फे दिला जाणारा कै. कुमुद बन्सल उत्कृष्ट शैक्षणिक ग्रंथ पुरस्कार.
डॉ. श्रुती आपल्या सहकाऱ्यांसोबत वेगवेगळे अभ्यासप्रकल्प राबवत असतात. त्या निमित्ताने भिन्न आर्थिक स्तरांमधील, विविध समाजगटांमधील, गावांतील, शहरांतील, सरकारी शाळांतील, खाजगी शाळांमधील, वेगवेगळ्या क्षमता असणाऱ्या मुलांचे त्यांनी निरीक्षण केले आहे. त्यातून त्यांच्या वर्तनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी उपायांच्या दिशा सुचवल्या आहेत. याविषयी त्या आपल्या व्याख्यानांमधून, कार्यशाळांमधून, यू ट्यूब चॅनलच्या माध्यमातून संवाद साधत असतात.
जन्माला आलेल्या प्रत्येक बाळाची वाढ नीट होणे, ही त्या बाळाच्या पालकांइतकी समाज म्हणून आपली सर्वांचीही जबाबदारी आहे याविषयी डॉ. श्रुती आग्रही आहेत; आणि त्यासाठी कार्यरत आहेत.
