Skip to product information
1 of 2

Payal Books

Mee Dharmikta Shikavto Dharma Nahi By Osho Translated By Mrunalini Gadkari

Regular price Rs. 225.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 225.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
गेली सुमारे तीनचार दशके, आपल्या अमोघ वाणीने आणि वेगळ्या विचाराने बुद्धिमंतांना मंत्रमुग्ध करणाया ओशोंच्या निवडक बावीस व्याख्यानांचे संकलन म्हणजेच ‘मी धार्मिकता शिकवतो, धर्म नाही’ हे पुस्तक. ह्या पुस्तकातील लेखांना व्याख्याने तरी कसे म्हणायचे? व्याख्यान आणि आख्यान ह्या दोहोंचा समन्वय साधणारा हा आगळावेगळा प्रकार आहे. मात्र एकदा पुस्तक वाचायला सुरुवात केल्यावर आपण त्या वाचनात गुंगून जातो. ओशो प्रत्येक गोष्टीकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतात. हे त्यांचे वैशिष्ट्य ह्या पुस्तकाच्या नावावरूनच आपल्या लक्षात येते. त्यांनी इथे ‘धर्म’ ह्या संकल्पनेलाच छेद दिला आहे. मात्र ‘धार्मिकता’ ही संकल्पना ते मान्य करतात. अर्थात, ‘धार्मिकते’चा त्यांनी लावलेला अर्थ ‘योग्य, चांगलं आचरण’ असा आहे. हा अर्थही आपल्याला अभिप्रेत असलेल्या अर्थापेक्षा वेगळाच आहे. धर्माने लोकमानसावर देव, पापपुण्य, स्वर्गनरक, मनोनिग्रह, त्याग अशा गोष्टींचा इतका जबरदस्त पगडा बसवला आहे, की ओशोंचे विचार अशा मनाला अतिशय क्रांतिकारक वाटल्यास नवल नाही. सखोल चिंतनशीलता, प्रगाढ बुद्धिमत्ता आणि व्यापक अभ्यास असल्याशिवाय असे विचार मांडणे अशक्य आहे. अति गोड, रसाळ, प्रवाही भाषा, नर्म विनोद, चुटके सांगण्याची मोहक लकब ही ह्या लेखांची महत्त्वाची वैशिष्ट्ये. म्हणूनच पुस्तक वाचू लागताच ओशो आपल्याशी प्रत्यक्ष बोलत आहेत, असे वाटत राहते आणि असा संवाद साधला गेल्यामुळे