Skip to product information
1 of 2

Payal Books

Mazi Katemundharichi Shalaमाझी काटेमुंढरीची शाळा गो. ना. मुनघाटे

Regular price Rs. 156.00
Regular price Rs. 175.00 Sale price Rs. 156.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication

बाबुजी काहेको मरने काटेमुंढरी जाते हो" असा सल्ला जातानाच मिळूनही, ज्या गावात शिक्षकाचा खून होतो. त्याच गावात एक शिक्षक गडद अंधाऱ्या रात्री प्रवेश करतो.... पंचवीस वर्षे त्याच अंधारात चाचपडत, ठेचकाळत शिक्षणाची नवी पहाट गावाला दाखवतो... उजाडतं तेव्हा त्याच शाळेत शिकलेला विद्यार्थी त्याच शाळेचा मुख्याध्यापक होऊन राष्ट्रपती पदक विजेता झालेला.... एखाद्या चित्रपटासारखे खिळवून ठेवणारे हे कथानक. एकाचवेळी शिक्षणाचे प्रश्न आणि आदिवासींची संस्कृती, पाठ्यपुस्तकात आणि चार भिंतीत न मावणारी आदिवासी मुलांची जिज्ञासा, खळाळणाऱ्या पाण्यासारखं आदिवासींचं निरागस जगणं, हे सार पानापानावर भेटत राहतं. नक्षलवादाच्या खोट्या आरोपानं आत्महत्या करणारा एक आदर्श शिक्षक नागोसे गुरुजी, निरक्षर असूनही शिक्षणाविषयी अपार आस्था असणारा मडगू पाटील, कंदमुळं खाऊनही शाळेत जाण्यासाठी बापाचा मार खाणारा शिदू ही पात्रं मनात रुतून बसतात.

 

आज शिक्षकांच्या बांधिलकीवर समाजाची चर्चा केन्द्रित होताना, जुन्या काळातील शिक्षकाचां प्रतिनिधी ठरणारा हा काटेमुंढरीचा गुरुजी आणि त्याची पिढी दंतकथा वाटू लागते.

 

आज बहुतेक शिक्षक गावात राहत नाही. गावातील राजकारणही समाजकारणानं नासते. गावकरी कामाला जाताना गुरुजी गावात येतो. आणि गावकरी संध्याकाळी परतताना गुरुजी निघून जातो. आजच्या या नव्या नात्याला अंतर्मुख करणारी ही कहाणी आहे, ऐहिक सुखाकडे पाठ फिरवून पंचवीस वर्षे आदिवासी गावात पाय रोवून उभ्या राहणाऱ्या शिक्षकाची!

 

सुवर्ण महोत्सवी महाराष्ट्र आज अशाच बिनचेहऱ्याच्या जुन्या पिढीच्या गुरुजींच्या खांद्यावर उभा आहे.