PAYAL BOOKS
Mazi Janmthep By Vinayak Damodar Savarkar माझी जन्मठेप
Couldn't load pickup availability
Mazi Janmthep By Vinayak Damodar Savarkar माझी जन्मठेप
भारतातील बऱ्याच देशभक्तांना काळ्या पाण्याची शिक्षा झालेली आहे. त्यांची नावे आपल्याला मिळतात; परंतु ती शिक्षा कशा प्रकारे दिली जायची, किती भयाण प्रकारे दिली जायची, याचे वर्णन असणारे पुस्तक म्हणजे 'माझी जन्मठेप'.
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील योद्धे वीर सावरकर यांना दोनदा जन्मठेपेची शिक्षा झाल्यानंतर त्यांची खानगी अंदमानला केली गेली. तेथले त्यांचे जीवन म्हणजे मृत्यूशी झुंज होती; पण त्या झुंजीत मृत्यूचा पराभव झाला आणि सावकरांचा जय झाला. सावरकरांच्या वीर रसाने ओथंबलेल्या चरित्रामध्ये अनेक रोमहर्षक पर्व आहेत. त्यांपैकी अंदमान पर्व हे अत्यंत रौद्र आणि भयानक पर्व आहे. त्याची रोमांचकारी कथा 'माझी जन्मठेप' या कथेत सावरकरांनी सांगितलेली आहे.
स्वातंत्र्य हे कधीच सहज मिळाले नाही याची जाण 'माझी जन्मठेप' हे पुस्तक करून देते आणि म्हणूनच ते स्वातंत्र्याचे महत्त्व अधोरेखित करते.


