Skip to product information
1 of 2

Payal Books

Maza Sakshatkari Hrudayrog By Dr Abhay Bang

Regular price Rs. 203.00
Regular price Rs. 225.00 Sale price Rs. 203.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Condition
Publication
Language

'डॉ. अभय बंग, एम.डी. गडचिरोली सारख्या आदिवासी भागात स्वयंप्रेरणेने राहून आरोग्यसेवा देणारे डॉक्टर, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संशोधक, वयाच्या चव्वेचाळिसाव्या वर्षी त्यांना अचानक ह्रदयविकाराचा झटका आला. ... हा हृदयविकार खरंच अचानक झाला का? की वर्षानुवर्षं तो रोज होतच होता; फक्त मला तो एक दिवशी अचानक जाणवला? मृत्यूच्या जवळून दर्शनाचा माझ्या मनावर काय परिणाम झाला? माझ्या हृदयरोगाचं कारण मला काय सापडलं? हृदयरोगातून बाहेर येण्यासाठी मी काय केलं? मी हृदयरोगाचा उपचार करण्याऐवजी हृदयरोगानेच माझा उपचार कसा केला? ही कहाणी 1996 साली साप्ताहिक सकाळच्या दिवाळी अंकात प्रकाशित झाली. तिने जणू पूर्ण महाराष्ट्राला हलवून सोडलं. लक्षावधी लोकांनी ती वाचली, इतरांना दिली. हृदयरोगतज्ज्ञ आपल्या रुग्णांना औषधासोबत तो लेख द्यायला लागले. त्या वर्षीचा उत्कृष्ट ललित कृतीचा स्व. अनंत काणेकर पुरस्कार त्या लेखाला मिळाला. पुस्तकरूपात ती कहाणी आता उपलब्ध होते आहे. ... हृदयरोगामुळे माझ्या जीवनात सुरू झालेला शोध मला हृदयरोगापलीकडे घेऊन गेला. नंतर तर तो पुढला शोधच मध्यवर्ती झाला. सकाळमधला लेख लिहिल्यावर देखील तो शोध सुरूच राहिला. तो माझा नंतरचा प्रवास देखील इथे सांगितला आहे. शिवाय रुग्णांना, जिज्ञासूंना गरज पडते अशी माहिती शेवटी वेगळया प्रकरणात समाविष्ट केली आहे. ... आणि या कहाणीचा अंतही झालेला नाही. अजूनही रोज काहीतरी घडतं आहे.