Skip to product information
1 of 2

Payal Books

Maz Sharir Maza Swabhimanमाझं शरीर माझा स्वाभिमान सोनया रेने टेलर SONYA RENEE TAYLOR

Regular price Rs. 220.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 220.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

या पुस्तकामुळे मी भारावून गेले, आणि सत्याचा सहजतेने स्वीकार करु शकले.. - ब्रेनी ब्राउन, पीएचडी न्यूयॉर्क टाइम्स बेस्टसेलर लेखक आपल्यापैकी प्रत्येकाकडे शरीर आहे हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही. या शरीरामुळेच आपली ओळख निर्माण होते. जेव्हा कोणतीही व्यक्ती आपल्या समोर येते तेव्हा सर्वप्रथम तिच्या शरीराकडे लक्ष जाते आणि मग नकळत सुरू होते तुलना. उंची, रंग, जाडी, वर्ण अशा कितीतरी गोष्टींच्या आधारे आपल्यापैकी प्रत्येकाकडे 'सर्वसामान्य' आणि 'आदर्श' शरीराची व्याख्या तयार असते. आपण समोरच्याला आपल्या मान्यतांच्या चौकटीत बसवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामधून सुरू होते भेदभाव करण्याची प्रक्रिया. कोण कसा दिसतो यावरून त्याला मिळणारी वागणूक ठरत असलेल्या या यंत्रणेला तडा देण्यासाठी लेखिकेने 'माय बॉडी इज नॉट अॅन अॅपॉलॉजी' ही चळवळ उभारली. शारीरिक भेदभावाच्या आधारावर मानसिक आणि शारीरिक यातना सहन करणाऱ्या लोकांसाठी ही चळवळ नवसंजीवनी आहे. शरीराचा फक्त स्वीकार न करता त्याचा अभिमान बाळगण्याचा बहुमोल सल्ला त्या देतात. शारीरिक स्तरावरील भेदभाव पूर्णपणे बंद होऊन सर्वांना समान वागणूक देणाऱ्या आदर्श जगाचं स्वप्न आणि ते साकार करण्यासाठी सर्व जण कशा प्रकारे हातभार लावू शकतात याचा आराखडा त्यांनी या पुस्तकात दिला आहे. ज्याच्याकडे शरीर आहे अशा प्रत्येकाने वाचायलाच हवे असे हे पुस्तक आहे.