Payal Books
Maunachi bhashantare (मौनाची भाषांतरे) BY Sandeep Khare
Couldn't load pickup availability
Maunachi bhashantare (मौनाची भाषांतरे) BY Sandeep Khare
शिक्षण इंजिनिअरिंगमध्ये... व्यवसाय - जाहिरातक्षेत्रात अनेक सन्मान पटकवणारा आघाडीचा कॉपीरायटर, जिंगल, टीव्ही - रेडिओ अॅड क्षेत्रात कार्यरत... इयत्ता चौथीपासून जडलेला कवितेचा छंद मात्र या साऱ्याच्या पार्श्वभूमीवर एखाद्या सुंदर षडजासारखा लागून राहिलेला... 'दिवस असे की', 'मी गातो एक गाणे', 'कधी हे - कधी ते', 'आयुष्यावर बोलू काही' या 'स्वतःच्या कविता, स्वतःच संगीत, स्वतःच गायन' केलेल्या कॅसेटसमुळे जसा सर्वसामान्य रसिक डोलला, तसंच जाणकार समीक्षकांनी मनमोकळी दाद दिली. 'कॅलिडोस्कोप', 'आयुष्यावर बोलू काही' या काव्यवाचनाच्या कार्यक्रमातून काव्यसादरीकरणाची एक आगळीच शैली त्याने निर्माण केली. सिनेमा, मालिका, नाटक, कॅसेटससाठी देखील गीतलेखन व संगीत.
'मौनाची भाषांतरे' हा त्याचा पहिलाच काव्यसंग्रह. संवेदनांची त्रीव्रता हा संदीपच्या कवितेचा स्थायीभाव. त्या त्या क्षणाशी प्रामाणिक राहताना, कुठल्याही एका शैलीत, विषयात न रेंगाळता, वृत्तछंद व मुक्तछंद अशा साऱ्या निकषांच्या पलिकडे ही कविता काही वेगळंच आणि थेट बोलू पाहते. म्हणून तर तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत आणि रसिकांपासून समिक्षकांपर्यंत ती साऱ्यांच्याच उत्सुकतेचा आणि कौतुकाचा विषय बनली आहे.
