Skip to product information
1 of 2

Payal Books

Mattir By Mahadeo More

Regular price Rs. 216.00
Regular price Rs. 240.00 Sale price Rs. 216.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
गेली ४७ वर्षे सातत्याने ललित लेखन करीत असलेल्या, उपेक्षित निपाणी सीमा भागातील माणसे व परिसर मराठी साहित्यात अजरामर करून आपल्या गावचा लौकिक गगनावरी नेलेल्या श्री. महादेव मोरे यांच्या ह्या नव्या कथासंग्रहात ९४ ते ०५ सालापर्यंत विविध दिवाळी अंकांतून प्रसिद्ध झालेल्या कथांचा समावेश आहे. ग्रामीण, दलित, नागर आदी वाङ्मय प्रकारांना सामावून घेणारे वैविध्यपूर्ण लेखन त्यांनी केले असले तरी त्यांच्या लेखणीचा खरा ओढा समाजाच्या तळाच्या थरातील भरडल्या जाणाया शोषितांचे जीवन चित्रण करण्याकडे आहे. मराठी साहित्यात ‘दलित साहित्य’ हा शब्दप्रयोग रूढ होण्याच्या कितीतरी वर्षे आधीपासून श्री. अण्णाभाऊ साठे, प्रा. डॉ. शंकरराव खरात, श्री. नारायण सुर्वे आदींच्या बरोबरीने विविध नियतकालिकांतून शोषितांची दु:खे पांढरपेशी संवेदनशीलतेला धक्का देत त्यांनी मांडली आहेत. पांढरपेशी परिघाबाहेर जगणाया किती एक मानव समूहाला शारदेच्या दरबारात आणण्याचे काम त्यांनी ताकदीने केले आहे. पिचलेली, खचलेली माणसे व समाजव्यवस्थेतून आलेले त्यांचे दु:खभोग कुठेही उथळपणा न आणता उत्कट संवेदनशीलतेतून त्यांनी आपल्या साहित्य कृतीतून प्रकट केले आहे. गंभीर लेखनाप्रमाणे गंमतीदार, मिश्कील लेखनातही त्यांनी आपल्या लेखणीची हुकमत सिद्ध केली आहे. आपल्या ह्या मिश्कील कथांद्वारे ते माणसातील आदिम वृत्तीप्रवृत्तींचा मनोज्ञ वेध घेत असल्याचा सुखद प्रत्यय येतो. त्यांची लेखनशैली खास त्यांची स्वत:ची असून तीवर पूर्वसुरींच्या, तसेच त्यांच्या समकालीन कुठल्याही साहित्यिकाची छाप नाही. शेतमजूर, मोटार मेकॅनिक, टॅक्सी ड्रायव्हर असं विविध पातळ्यांवरील जीणं जगत त्यांनी काही वर्षे मिरची पूड तयार करण्याच्या मशीनवरही काम केलं आहे. सत्तरी जवळ आली तरी वृद्ध साहित्यिकांना दिल्या जाणाया सरकारी सन्मानधनाकडे पाठ फिरवून पिठाच्या गिरणीत राबणाया कामगाराचे आयुष्य सन्मानाने जगत मराठीतील कुणा साहित्यिकाला अभावानेच आले असतील असे अनुभव घेत तेच अनोखे, अस्पर्श असे गारुड आपल्या चितरुण लेखणीतून ते प्रकट करीत असतात. गंभीर गंमतीदार अशा ‘मत्तीर’ मधील त्यांच्या ह्या नव्या व्यामिश्र कथा रसिक वाचकांना नक्कीच भावतील.