Mativarchya Oli |मातीवरच्या ओळी Author: Dr. Janardan Waghmare|डॉ. जनार्दन वाघमारे
माणसाच्या आठवणी ह्या एका अर्थाने त्याच्या पाऊलखुणाच असतात. खरे तर त्याच्या स्मृतितील त्या अंधुक वा ठळक अशा ओळीच असतात. आपल्या स्मृतिकोशातील शब्द घेऊन त्यानेच त्या ओळी लिहिलेल्या असतात. मोडक्या तोडक्या भाषेत आणि जमेल त्या पद्धतीने! माणसाच्या स्मृतिकोशात खरे तर सगळे विश्व सामावलेले असते. त्याच्या आठवणींचा पसारा त्यात आडवातिडवा व इतस्तत: पडलेला असतो. त्यात अनेक घटना, घडामोडी व प्रसंगांच्या नोंदी असतात. त्या घटना, घडामोडी आणि प्रसंगांनी त्याच्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीमध्ये वाटा उचललेला असतो. असे अनेक प्रसंग, आठवणींनी आयुष्य समृद्ध होत असते. एका अर्थाने ते वेगळे आत्मचरित्रच असते. डॉ. वाघमारे यांच्या ‘मूठभर माती’ या आत्मचरित्रात समाविष्ट होऊ न शकलेल्या ह्या आठवणी त्यांचे व्यक्तिमत्व समजून घेण्यास अधिक उपयुक्त ठरतील.