Marubhumitun Baher|मरुभूमीतून बाहेर Author: Dr. Shrinivas Sathe|डॉ. श्रीनिवास साठे
आपली जन्मभूमी सोडून अन्यत्र जाऊन तेथेच स्थायिक होण्याची प्रक्रिया ही मनुष्यसमाजात फार पूर्वीपासून चालू आहे. ही प्रक्रिया म्हणजे सामाजिक-सांस्कृतिक स्थलांतराची व मानवजातीची कहाणी आहे. आज स्थलांतर ही एक विद्याशाखा आहे. जैन धर्म, त्याचा उगम, प्रसार व जैनांचे स्थलांतर - यांबाबतची चर्चा येथे केली आहे. राजस्थान-मारवाडचा पूर्व-इतिहास सांगतानाच तेथून झालेले स्थलांतर व त्याची कारणमीमांसाही लेखकाने केली आहे. ह्या ग्रंथाच्या निमित्ताने डॉ. श्रीनिवास साठे यांनी जैन उद्योगसमूहाचे संस्थापक मा. भवरलालजी जैन यांच्या घराण्याचा पूर्व-इतिहास सविस्तर सांगितला आहे. हा इतिहास मा. भवरलाल जैन यांच्या पूर्वजांच्या स्थलांतराचा, मारवाडी व ओसवाल श्वेतांबर जैन या समाजाची वैशिष्ट्ये सांगणारा आणि त्यांच्या व्यापार-व्यवसायाची गुणवैशिष्टये स्पष्ट करणारा आहे. एका दुष्काळी भागातून स्थलांतरित झालेले जैन कुटुंब जगप्रसिद्ध उद्योगपती कसे होते, हे सांगणारा हा इतिहास केवळ जैन समाजालाच नव्हे तर सर्वांनाच प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरेल हे नक्की.