Skip to product information
1 of 2

PAYAL BOOKS

Marmik Prabodhanache Shatak मार्मिक प्रबोधनाचे शतक By Adv. Harshal Pradhan

Regular price Rs. 350.00
Regular price Rs. 400.00 Sale price Rs. 350.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

Marmik Prabodhanache Shatak मार्मिक प्रबोधनाचे शतक By Adv. Harshal Pradhan

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे

महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक इतिहासात ठाकरे कुटुंबाचा प्रभाव अविभाज्य आहे. केशव सीताराम ठाकरे ऊर्फ प्रबोधनकार ठाकरे (१८८५-१९७३) आणि  त्यांचे पुत्र बाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे (१९२६-२०१२) या दोघांच्या विचारसरणीने  महाराष्ट्राला एक नवी दिशा दिली. प्रबोधनकारांच्या सुधारणावादी आणि विवेकवादी दृष्टिकोनातून सुरू झालेला प्रवास बाळासाहेबांच्या मराठी अस्मिता आणि हिंदुत्ववादी विचारसरणीपर्यंत पोहोचला. या विचारांचा परिणाम म्हणजे महाराष्ट्रात झालेल्या दीर्घकालीन सुधारणा. ज्यात संयुक्त महाराष्ट्र चळवळ, सामाजिक समता, राजकीय लोकशाहीकरण आणि सांस्कृतिक जागृतीचा समावेश आहे. प्रबोधनकार ठाकरे हे महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणांच्या इतिहासातील एक प्रमुख व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी जातिव्यवस्था, अंधश्रद्धा, बालविवाह, हुंडा आणि अस्पृश्यता यांसारख्या सामाजिक चालींविरुद्ध 
लढा दिला. त्यांचे ‘प्रबोधन' हे पाक्षिक त्यांच्या विचारांचे प्रमुख माध्यम होते. ज्यातून त्यांनी समाजाला 
विवेकवादी आणि प्रगतिशील बनवण्याचा प्रयत्न केला. प्रबोधनकारांनी महात्मा ज्योतिबा फुले, 
छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना चालना देत मराठी समाजाला शिक्षण, 
स्वाभिमान आणि समतेच्या दिशेने अग्रेसर केले. त्यांचे प्रमुख योगदान म्हणजे संयुक्त महाराष्ट्र चळवळ. 
१९५० च्या दशकात ते संयुक्त महाराष्ट्र समितीचे नेते होते आणि मुंबईसह मराठी भाषिक भागांना एकत्र 
करून स्वतंत्र राज्याची मागणी त्यांनी लावून धरली. ही चळवळ १९६० मध्ये यशस्वी होऊन महाराष्ट्र 
राज्याची निर्मिती झाली.