Marhata Patshah मऱ्हाटा पातशाह By Ketan Puri केतन कैलास पुरी
Marhata Patshah मऱ्हाटा पातशाह By Ketan Puri केतन कैलास पुरी
70 पेक्षा जास्त संदर्भग्रंथ आणि 250 पेक्षा जास्त डच भाषेतील कागदपत्रांचे भाषांतर करून अतिशय अपरिचित माहितीचे दालन उलगडून दाखवणारा संदर्भग्रंथ म्हणजेच ‘#मऱ्हाटा_पातशहा’.
एक वर्षात तब्बल चार हजार प्रतींची विक्री करणारे ऐतिहासिक पुस्तक म्हणजे 'मऱ्हाटा पातशाह'.
मऱ्हाटा पातशाह
शिवाजी महाराजांच्या सर्वात पहिल्या चित्राची निर्मिती ज्या प्रसंगी झाली, त्याचे केलेले वर्णन.. एका उत्कृष्ट चित्रकाराकडून.. एक असा व्यक्ती जो शिवाजी महाराजांना भेटला, त्यांची चित्रे काढली.. पण आजही इतिहासाच्या पानांमध्ये हरवला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व समकालीन चित्रांचा, त्यांच्या राजयोगी व्यक्तिमत्वाचा ऐतिहासिक कागदपत्रांच्या आधारे घेतलेला मागोवा म्हणजेच मऱ्हाठा पातशाह.
शिवरायांची एकूण किती अस्सल चित्रे आहेत? आज ही चित्रे कुठे गेली? या चित्रांना भारताबाहेर प्रवास करावा लागला, त्याचे कारण होते औरंगजेब.. औरंगजेबामुळे आज शिवाजी महाराजांची सर्व अस्सल चित्रे भारताबाहेर कशी गेली ? याची संदर्भासहित माहिती तुम्हाला समजेन.
छत्रपती शिवाजी महाराज नेमके कसे दिसायचे ? त्यांचं बोलणं कसं असेल ? खाजगी आयुष्यात त्यांचा वावर कसा असेल ? असे एक ना अनेक प्रश्न कदाचित आपणा सर्वांनाच पडतात.
केतन पुरी यांनी अतिशय मेहनतीने आणि संशोधन पूर्व लिहिलेलं ‘मऱ्हाटा पातशाह’ हे पुस्तक आपल्या या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्यास समर्थ आहे.
या पुस्तकात समकालीन राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय लेखक, इतिहासकार, प्रवासी, चित्रकार, व्यापारी व सैन्य अधिकारी ( जे प्रत्यक्ष महाराजांना भेटले आहेत) यांनी महाराजांचं केलेलं वर्णन केतनने बारकाईने अभ्यासून या पुस्तकात समाविष्ट केलेलं आहे .
महत्वाचं म्हणजे आंतरराष्ट्रीय चित्रकारांनी महाराजांची काढलेली दुर्मिळ व महत्वाची चित्रे आणि त्या चित्रांच्या आधारे केतन सरांनी केलेलं विश्लेषण छत्रपती शिवाजी महाराज यांची हुबेहूब प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर उभी करण्यास मदत करतात. तसेच,हि सर्व चित्रे आणि ऐतिहासिक दस्तऐवज छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्वाचे अनेक महत्वाचे पैलू उलगडतात.
तब्बल चाळीसपेक्षा जास्त दुर्मिळ आणि रंगीत चित्रे , त्यांची माहिती तुम्हाला ह्या पुस्तकात मिळेन.
मऱ्हाटा पातशाह
लेखक संकलक : केतन पुरी
प्रकाशक - न्यू इरा पब्लिशिंग हाऊस पुणे
प्रकार - छ शिवाजी महाराजांच्या समकालीन चित्रांचा समावेश आणि इतिहास सांगणारा संदर्भ ग्रंथ.
किंमत : 300 रु
मऱ्हाटा पातशाह संदर्भ ग्रंथ तीन ते चार दिवसात घरपोच मिळेल