Skip to product information
1 of 2

Payal Books

Marau Hai Jogi Marau | मरौ है जोगी मरौ by AUTHOR :- Osho

Regular price Rs. 312.00
Regular price Rs. 350.00 Sale price Rs. 312.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publications

‘ध्यान’ म्हणजे परमेश्वराशी संयोग. जो ध्यान करतो तो स्वत:शी आणि परमेश्वराशी जोडला जातो. मनातल्या विचारांच्या वादळास शांत, संयमी बनविण्याचे सामर्थ्य ध्यानसाधनेत आहे. मृगजळासमान असणारी तृष्णा, वासना, अहंभाव, अज्ञानरूपी अंधकार या गोष्टी ध्यानामुळेच लुप्त होतात. ध्यान हे आजच्या धकाधकीच्या जीवनात मन:शांती देणारे आणि तात्काळ परिणाम दर्शविणारे आहे.
या पुस्तकात ओशोंच्या ध्यानसाधनेवर आधारित दहा प्रवचनांचा समावेश आहे. सध्याच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक व्यक्तीला ताणतणावाने ग्रासले आहे. या प्रवचनांतून तणावमुक्त जीवन जगण्याचा निश्चित मार्ग सापडतो. परमेश्वरास अपेक्षित असे जीवन जगून त्याच्यापर्यंत पोहोचायचं असेल तर जीवनात ध्यानसाधनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
‘मनश्चक्षू उघडून बघा’, ‘एक नवीन आकाश हवंय’, ‘मेघ दाटून आलं’, ‘सहज अजाणता आलात’ अशा दहा प्रवचनांतून ओशोंनी साधकांच्या विविध शंकांचं संवादात्मक स्वरूपात निरसन केलेलं आहे. ओशोंची ही प्रवचने आयुष्यातील ताणतणाव कमी करणारी; तसेच साधकाला ज्ञानी व उत्साही बनविणारी आहेत. स्वत:शी झगडत बसण्यापेक्षा स्वत:त सुधारणा घडवून आणण्यात मदत करणारी आणि मानवीजीवनात नवचैतन्य निर्माण करणारी ही प्रवचने आहेत.