Marathi Vyakran : Swaroop Va Chikitsa । मराठी व्याकरण : स्वरूप व चिकित्सा Author: Khanderao Kulkarni । खंडेराव कुलकर्णी
श्री. खंडेराव कुलकर्णी यांची ‘व्याकरण म्हणजे शब्दशास्त्र’
ही भूमिका या पुस्तकात स्पष्ट झाली आहे,
त्या दृष्टीने त्यांनी ‘शब्दविचार’ व ‘शब्दविकरण’ या
दोन घटकांवर लक्ष केंद्रित केले आहे.
कर्तरी, कर्मणी, भावे इत्यादी प्रयोगांमध्ये व्याकरणदृष्टीने
वाक्यांचा विचार येतो. हा प्रयोगदृष्टीने येणारा विचार त्यांनी वाक्यशास्त्रात केला आहे.
वाक्यशास्त्र व व्याकरण ह्या दोन्ही भाषिक शास्त्रांची विस्तृत चर्चा येथे केली आहे.
अलंकार व वृत्ते ह्या व्याकरणाच्या कक्षेत न येणार्या विषयांचा
अभ्यासकांच्या माहितीसाठी परिचय करून दिला आहे.
तो शालेय विद्यार्थ्यांना व शिक्षकांनाही उपयुक्त आहे.
मराठी व्याकरणाची (शुद्ध) नियमानुसारी व
(अशुद्ध) नियमबाह्य रचना नेमकेपणाने समजून घेण्यासाठी
व तिला वळणात ठेवण्यासाठी आपले पूर्वसंचित काय आहे,
त्याचा परिचय होणे आवश्यक असते. या ग्रंथाने त्याचे आकलन
नक्की होऊ शकेल.