शालेय शिक्षणात व्याकरणाकडे फारसे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या लेखनात अनेक चुका आढळून येणे नित्याचेच झाले आहे. पदवी परीक्षा व पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांची सुद्धा हीच गत असते. अनेक चांगले चांगले शब्द लक्षात ठेवून, त्यांचे अर्थ व्यवस्थित समजावून घेऊन ते शब्द आपल्या बोलण्यात व लेखनात वापरावेत. योग्य स्थानी कुशलतेने शब्द योजले, तर त्यांच्या द्वारे आपल्या भावना, कल्पना आणि विचार प्रभावीपणे व्यक्त करता येतात. आपले भाषण व लेखन बांधेसूद व ठसठशीत बनते. त्याचा प्रभाव ते ऐकणाऱ्या व वाचणाऱ्या व्यक्तीच्या मनावर चांगल्या रीतीने पडतो. यासाठी विद्यार्थ्यांना समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, अनेक शब्दांऐवजी त्यांचा अर्थ एकाच शब्दात व्यक्त करणारे शब्द; तसेच एकाच शब्दाचे अनेक अर्थ, थोड्याफार फरकाने अर्थात बदल होणारे शब्द आणि जोडीने येणारे शब्द यांचे ज्ञान अत्यावश्यक असते. याची सखोल माहिती या पुस्तकातून तुम्हाला मिळेल. शब्दांचे ज्ञान व्हावे या दृष्टीनेच या शब्दकोशाची निर्मिती केलेली आहे. |
Payal Books
Marathi Shabdakosh | मराठी शब्दकोश by AUTHOR :- S.D.Zambre
Regular price
Rs. 124.00
Regular price
Rs. 140.00
Sale price
Rs. 124.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
