Marathi Book Karmavir Aanna By: अजित पाटील
शिक्षणाच्या माध्यमातून समाज जीवनाच्या सर्व अंगाना स्पर्श करून ज्ञानगंगा चंद्रमोळी झोपडीपर्यंत पोहचविणारे महामानव व रयत शिक्षण संस्थेचे द्रष्टे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील.
रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ज्यांनी सामान्य माणसाच्या जीवनात अभूतपूर्व कायापालट घडवून त्यांना माणूस म्हणून जगण्याची संजीवनी दिली.
कर्मवीरांच्या व्यक्तिमत्वाचे, कार्याचे दर्शन रसिक अभ्यासकांना तसेच सामान्य माणसांना घडावे या उदात्त हेतूनेकर्मवीरांचे नातू प्रा. अजित पाटील यांनी नम्र व कृतज्ञतेच्या भावनेतून कर्मवीरायण शब्दबद्ध केले आहेच परंतु त्याचा जन्म जिज्ञासेतून झाला आहे. कर्मवीरायण हे आण्णांचे तेजस्वी, प्रेरणादायक चरित्र आहे.
शतके येतील आणि जातील पण भावी पिढीसमोर कर्मवीर आण्णांच्या कार्याचा आदर्श सदैव राहिल. कर्मवीरायण दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरेल.