Marathi Bhasha - Udgam Va Vikas By Krushnaji Pandurang Kulkarni
Regular price
Rs. 356.00
Regular price
Rs. 395.00
Sale price
Rs. 356.00
Unit price
per
‘मराठी भाषा सर्व प्राकृत भाषांच्या, त्यातल्या त्यात महाराष्ट्री व अपभ्रंश यांच्या मिश्रणाने इसवी सन ५००-७००च्या दरम्यान उद्भवली व उत्क्रांत होत गेली...’ ‘समाजक्रांती, धर्मक्रांती व भाषाक्रांती या समसामायिक असतात.’ प्रा.कृ.पां.कुलकर्णी यांनी या ग्रंथात मराठी भाषेचा ऐतिहासिक, संशोधनपूर्ण आणि सोपपत्तिक उलगडा करून दाखवला आहे. भाषाशास्त्राची सामान्य तत्त्वे; मराठी भाषेच्या उद्गमापूर्वीच्या पूर्ववैदिक, वैदिक, संस्कृत, पाली, प्राकृत, अपभ्रंश या अवस्थांचे संशोधन; मराठीचे कालिक, प्रांतिक व इतर भेद यांचा समावेश प्रस्तुत ग्रंथात आहे. तसेच भाषाशास्त्राच्या ऐतिहासिक, तौलनिक, वर्णनात्मक, रचनात्मक अशा विविध अभ्यासपद्धती येथे विशद केल्या आहेत. निरनिराळ्या प्रांतिक व ग्रामिक बोलींचे महत्त्व जाणून त्याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. प्रा.कृ.पां.कुलकर्णी यांचा हा ग्रंथ मराठी भाषाप्रेमी व मराठीचे अभ्यासक यांच्यासाठी एक उपयुक्त व परिपूर्ण संदर्भग्रंथ आहे.