Payal Books
Manvantar Samuhakadun Swatakadeमन्वंतर समूहाकडून स्वत:कडे सुरेश द्वादशीवार
Couldn't load pickup availability
१९३० नंतर भारतात नवा विचार नाही आणि आठव्या शतकानंतर नवे तत्त्वचिंतन नाही. आमचे मन थांबले की बुद्धी ?
१९६० च्या दशकात जगाच्या समाजकारणाने आपली कूस बदलली आणि त्याचा प्रवास समूहगततेकडून व्यक्तिगततेकडे सुरू झाला. धर्म, तत्त्वपरंपरा, नीतिव्यवहार आणि विचारसरणी या समूहगततेच्या आधाराने उभ्या राहिलेल्या व्यवस्था राहतील की बदलतील?
■ जगभरच्या धर्मश्रद्धांनी माणसांना बळ दिले. मात्र त्याच वेळी त्यांनी ज्ञानविज्ञानाच्या परंपरा मोडीत काढल्या. ज्ञानविज्ञानाच्या नव्या युगात या श्रद्धा कशा असतील ?
■ आजवर व्यक्तीचे प्रश्न समाजात सुटत. पण समाज हाच एक महाप्रश्न होत असेल तर? कालपर्यंत संरक्षक वाटलेल्या व्यवस्था आजच काटेरी कुंपणांसारख्या जाचक ठरू लागल्या असतील तर?
या प्रश्नांचा वेध घेणारे हे सुबोध शैलीतील पुस्तक वाचनाचा व आकलनाचा आनंद तर देतेच, पण सम्यक व सकारात्मक दृष्टिकोन घडविण्यास मदत करते.
