Payal Book
Manucha Masa by Prof K L Mahale मनूचा मासा - प्रा कु ल महाले
Couldn't load pickup availability
Manucha Masa by Prof K L Mahale मनूचा मासा - प्रा कु ल महाले
संघस्थानावर इतर 'बौद्धिके' होत त्याला संघात 'इतिहास' हे संबोधन होते. आणि प्रभातशाखा, सायंशाखा, बालशाखा यात वयोगटाचा विचार न होता सतत जो 'इतिहास' शिकविला जाई त्याचे स्वरूप मध्ययुगीन 'रासो' सारखे वीरगाथा असे होते. या कथा ठरलेल्या होत्या, अनेक वर्षे, वेळीप्रसंगी त्याच त्याच कथा सांगितल्या जात म्हणून स्वयंसेवकांच्या मनावर ठसलेला इतिहास ठरावीक होता. पृथ्वीराज महंमद घोरीशी लढताना हारला कारण जयचंदाची फितुरी पण शेवटी दोन्ही डोळे काढलेल्या पृथ्वीराजाने शब्दवेधी बाणाने घोरीचा वध केला, राणाप्रताप हळदीघाटची लढाई, राणा- प्रताप हारला कारण मानासिंग व त्याचा स्वतःचा भाऊ. हळदीघाट ही संघाची विशेष प्रेरणा होती. कल्याणच्या सुभेदाराची लावण्यवती सून चारित्र्यवान शिवाजी बिदागी देऊन परत करतो, "आमच्या माँसाहेब इतक्या सुंदर असत्या तर आम्ही पण तितकेच सुंदर झालो असतो." शिवाजी रामदासाच्यां झोळीत आपले राज्य टाकतो व रामदासाचा प्रसाद म्हणून ते रामदासचरणी नतमस्तक होऊन स्वीकारतो, गुरु गोविंद सिंगाचे पाच खालसा आपली शिरे उडवून घेण्यासाठी एकामागून एक जात आहेत, संघाचा हा इतिहास कथात्मक रीतीने 'बौद्धिका'त शिकविला जात असे. संघाने पुरातन परंपरा स्वीकारली, ती पौराणिक कथांची परंपरा म्हणून. दंतकथा संघाचा 'इतिहास' झाला. बिचाऱ्या स्वयंसेवकांना हाच इतिहास आहे असे वाटते.
